नेपाळमध्ये चालणार आता भारतीय नोटा

बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:12 IST)
आता भारतीय 500 व 1000 रुपयांची नोट नेपाळ आणि भूतानमध्ये चालणार असून हा निर्णय बिहारमधून नेपाळ आणि भूतान यांच्याशी वाढलेला व्यापार लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. 
 
बिहारमधून मोठय़ा संख्येने व्यापारी माल विक्रीसाठी नेपाळ, भूतानमध्ये जातात. या देशांत 100 रुपयांवरील भारतीय चलन वापरण्यास बंदी असल्याने या व्यापार्‍यांना व्यवहारात अनेक अडचणी यायच्या. 
 
तसेच बिहारमधून सुटीसाठी नेपाळमध्ये जाणार्‍या सर्वसामान्यांनाही जवळ केवळ 100 रुपयांच्या प्रमाणात रक्कम बाळगावी लागायची. आता 500 व 1000 रुपयांची नोट बाळगता येणार असून रकमेसाठी 25,000 रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ामुळे आता नेपाळमध्ये जाणार्‍या भारतीय व्यापार्‍यांची चांगलीच सोय होणार आहे.
 
ही मर्यादा वाढवण्याबाबत रिझर्व्ह बँक विचार करत असून त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

वेबदुनिया वर वाचा