दहशतवादाची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने करावी: मोदी

मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (09:20 IST)
सॅन होजे- ‘‘अवघं जग आज दहशतवादाच्या सावटाखाली आहे. पण 70 वर्षे उलटल्यानंतरही संयुक्त राष्ट्रसंघ दहशतवादाची व्याख्या करू शकलेला नाही. गेली 40 वर्षे दहशतवादाला तोंड देणारा भारत आता आणखी वाट बघू शकत नाही. त्यामुळे कोण दहशतवादी आणि कोण दहशतवादविरोधी हे आता जगाला (संयुक्त राष्ट्रसंघ) ठरवावेच लागेल,’ अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
 
अमेरिका दौर्‍यावर असलेल्या मोदी यांचे कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे जोरदार स्वागत झाले. सॅन होजे येथील ‘सॅप सेंटर’मध्ये हजारो अनिवासी भारतीयांना संबोधित करताना मोदी यांनी भारताची बदललेली मानसिकता, नव्या सरकारच्या नव्या योजना, भारताची विविध क्षेत्रातील प्रगती यांचा लेखाजोखा मांडला. मोदी यांनी या व्यासपीठावरून जगाला भेडसावणारा दहशतवाद व ग्लोबल वॉर्मिगवरही भाष्य केले. ‘भारताविरुद्धच्या दहशतवादाची आठवण देतानाच मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादी कोण हे ठरवण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाकडं केली.
 

वेबदुनिया वर वाचा