तालिबानशी अखेरीपर्यंत लढा: झरदारी

तालिबान पाकिस्‍तानवर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे, मात्र आम्ही तालिबानींच्‍या अंतापर्यंत त्‍यांच्‍याशी लढा देणार असल्‍याचे माहिती पाकिस्‍तानचे राष्‍ट्राध्‍यक्ष आसीफ अली झरदारी यांनी दिली आहे.

झरदारी म्हणाले, की आतंकवादा विरोधातील या लढ्यात पाकिस्तानी सरकार, राजकीय पक्ष आणि लोकांचा आपल्‍याला पाठिंबा असल्‍याचे त्यांनी सांगितले.

तालिबानने स्वात खो-यात पाक सैन्‍याने चालविलेल्‍या कारवाईच्‍या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्‍ले केले असून देशातील अस्थिरतेमुळे पाकच्‍या अण्‍वस्‍त्रांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला आहे.

वेबदुनिया वर वाचा