डुकराच्या रक्ताने अंघोळ करते ही मॉडेल

सोमवार, 20 एप्रिल 2015 (17:48 IST)
कॅलिफोर्निया येथील एक सुंदरी आपले यौवन कायम ठेवण्यासाठी डुकराच्या रक्ताने अंघोळ करते. ती व्यवसायाने एक मॉडेल असून आपल्या तारुण्यासाठी जुनूनी आहे. ती सुंदरी शाकाहारी असूनदेखील डुकराच्या रक्ताने अंघोळ करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती फक्त 19 वर्षाची आहे.

एमटीव्ही ट्रू लाइफच्या एका एपिसोड मध्ये दाखविण्यात आले आहे की ती मॉडेल दावा करते की या प्रकारे रक्ताने अंघोळ केल्याने तिचं तारुण्य नेहमी असचं राहील. ह्या मॉडलचे नाव चानल असून ती कॅलिफोर्नियाची राहणारी आहे.

तिनी सांगितले अशी अंघोळ हजारो वर्षांपूर्वी लोकं करत असून ते तरुण राहण्यात यशस्वीदेखील झालेले आहेत. म्हणूनच ती पण असच   करत आहे. तिला म्हातारा होऊन तोंडावर सुरकुत्या नकोय. तिला याचा विचार करूनदेखील भीती वाटते म्हणूनच ती यापासून वाचण्यासाठी हवे ते करायला तयार आहे.

तिला म्हातारी होऊन तिचं करिअर संपण्याची भीती आहे. तिनी सांगितले की जेव्हापासून ती डुकराच्या रक्ताने अंघोळ करत आहे माझी बॉडी जास्त सॉफ्ट झाली आहे. ( Photo courtesy : Daily Mail)

वेबदुनिया वर वाचा