अमेरिकेतील साऊथ डकोटा येथील महिलेने अनेक वर्षे जॉन्सन अँड जॉन्सन पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप केला आहे. अलीकडेच याच कंपनीच्या पावडरमुळे अलाबामा येथील एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीला दंड ठोठावण्यात आला होता. कंपनीच्या विरोधात सध्या अशा प्रकारचे 1200 खटले सुरू आहेत. याचे कर्करोगाशी संबंध आहे याविषयी 45 वर्षांपूर्वी संशोधन सुरू झाले असून कंपनीलाही या धोक्याची पूर्णं माहिती होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.