जगातील सर्वात लहान बाळ जन्मले एमिलिया “छोटी योद्धा”

शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (15:35 IST)
आपण जगातील सर्वात उंच माणूस पहिला आहे. सर्वात बलवान माणूस पाहिला आहे तर जगातील सर्वात छोटी मुलगी आपल्या देशातील नागपूर येथील आहे. मात्र आता जगतील सर्वात छोट्या जिवंत आईच्या गर्भातून जिवंत जन्म घेतलेली लहान बाळाचा जन्म झाला आहे जर्मनी येथे. तिला सर्वांनी “छोटी योद्धा” "लिटील गर्ल वॉरिअर" असे नाव दिले आहे.
 
जगातील सर्वात लहान असलेल्या बाळाचे जन्माच्या वेळी वजन फक्त केवळ 227 ग्रॅम तर उंची लांबी 8.6 इंच म्हणजेच 22 सेमी होतं. एमिलिया ग्राबारचेक असं या बाळाचं नाव आहे. कमी वजन असूनही जगलेलं हे जगातील पहिलंच प्रीमॅच्युअर बाळ आहे.आणि त्याला जिवंत ठेवण्यात डॉक्टरराना यश आले आहे.
जर्मनीच्या विटेन शहरात एमिलियाचा जन्म झाला आहे. जन्माच्या वेळी तिच्या पायाची लांबी चक्क अर्ध्या अंगठ्याऐवढी होती आणि वजन 227 ग्रॅम होतं. त्यामुळे एमिलिया जगणार नाही, असंच सगळ्यांना वाटत होतं. 
 
विटेनमधील सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये एमिलियाचा गरोदरपणाच्या 26 व्या आठवड्यातच जन्म झाला आहे. तर तिला जिवंत ठेवण्यासाठी सीझेरियनद्वारे डिलिव्हरी करावी लागली आहे. तसे  नसती तर एमिलियाचा गर्भाशयातच मृत्यू झाला असता. गरोदरपणाच्या 26 आठवड्याच बाळाचं वजन 595 ग्रॅम असतं. पण एमिलियाचं वजन प्रमाणापेक्षा कमी होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
 
एमिलिया आता सुखरुप आहे. तिच्यामध्ये गंभीर स्वरुपाच्या आजाराची चिन्हं नाहीत. सुरुवातीला एका छोट्या ट्यूबद्वारे तिला भरवलं जात.
 
एमिलिया आता नऊ महिन्यांची असून तिच्या शरीराच्या भागांची सामान्य बाळांप्रमाणे वाढ होत आहे. सध्या तिचं वजन 3 किलोंपेक्षा जास्त आहे.
 
(जर्मन न्यूज आऊलेट ने ही बातमी जगप्रसिद्ध केली आहे.)

वेबदुनिया वर वाचा