चीनमध्ये शक्तीशाली भूकंप; एक ठार, 300 जखमी

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (16:13 IST)
चीनच्या युनान प्रांतात मंगळवारी रात्री उशीरा आलेल्या भूकंपाने एकाचा बळी घेतला आहे. 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. शक्तीशाली भूकंपाचे एकापाठोपाठ तीन धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. 
 
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 9.49 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. यूनाइटेड स्टेट जियॉलॉजिकल सर्व्हीसने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र यूनिजिन्घॉन्गहून 163 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 10 किलोमीटरवर आहे. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान जिन्ग्गू कौंटी आणि लिकेंग शहरात झाले आहे. जिंगू कौंटीमध्ये 92,000 नागरिकांना भूकंपाचा फटका बसला आहे. येथून सुमारे 56,880 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हजारो घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात वीज आणि दूरसंचार व्यवस्थाही ठप्प झाली आहे. मदतकार्य सुरू असून 600 स्वयंसेवकांची टीम स्निफर डॉग्सबरोबर तैनात करण्‍यात आले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा