बॅरंगारूक, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे एका लहान मुलीची आई जेड येट्स हिने दावा केला आहे की तिने मुलीच्या मॉनिटर स्क्रीनवर दोन भुतं पाहिले जे तिच्या झोपलेल्या मुलीवर फिरत होते.
ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मुलगी आपल्या बिछान्यात गाढ झोपलेली होती. जेडने म्हटले की तिला आपल्या मुलगी रूबी हिच्याभोवती भूत पाहण्याआधी भुतांवर मुळीच विश्वास नव्हता, पण व्हिडिओ पाहून तिला विश्वास करावा लागला.
मेलऑनलाइनसाठी जॅक पोल्डन लिहितात की जेडप्रमाणे भूत त्या मुलीला कोणतीही इजा करतील असे वाटत नाही तरी ही घाबरलेल्या आईने लिहिले आहे की ती रात्रभर झोपू शकली नाही. त्यांनी सांगितले की व्हिडिओत असे दिसतं आहे की रूबी आपल्या घोंगडीत झोपलेली आहे आणि अचानक तिच्यावर एक पांढरी आकृती दिसते. असे वाटतं की या आकृतीचे एक डोके आणि एक शरीर आहे. ही आकृती डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे फिरते आणि मग भीतींकडे जाते. नंतर ही आकृती संकुचित होऊन गायब होऊन जाते. आणि मग येतो दुसरा भूत...