'कोहिनूर'वर हक्क नाही : केंद्र सरकार

सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:23 IST)
कोहिनूर हिरा इंग्रजांनी लुटला नसून तो दिलीप सिंह यांनी इंग्रजांना भेट दिला होता. त्यावर आपला हक्क सांगू शकत नसल्याचे  सुप्रिम कोर्टातील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने  म्हटले आहे. कारण सरकारच्या म्हणण्यानूसार आता जर आपण त्या हिर्‍यावर हक्क सांगितला तर दुसर्‍या देशाचे सरकारही आपल्या देशातील काही वस्तूंवर आपला हक्क सांगेल.

कारण त्यांच्याही काही वस्तू आपण संग्रहालयात ठेवल्या आहेत. न्यायालयाने सरकारला 6 आठवड्यांचा वेळ दिला असून सरकारने कोहिनूर साठी या काळात काय केले याचे स्पष्ठीकरण सरकारला द्‍यावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा