केट मिडलटन गर्भवती?

वेबदुनिया

सोमवार, 7 नोव्हेंबर 2011 (12:35 IST)
WD
ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स यांची पत्नी 'डचेस ऑफ कँब्रिज' केट मिडल्टन गर्भवती असल्याची अफवा जोर धरत आहे. डेनमार्कच्या एका सहाय्यता केंद्रात शाही दौर्‍यादरम्यान, केट मिडल्टन यांना वारंवार पोटावर हात फिरवताना पाहिल्या गेले.

ब्रिटिश माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तांनुसार कोपनहेगन येथील एका साहाय्यता केंद्राच्या दोन तासांच्या भेटीदरम्यान 29 वर्षीय केट यांनी कमीतकमी 12 वेळा आपल्या पोटावर हात फिरविला. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी शेगदाण्यांपासून निर्मित एक खाद्यपदार्थ खाण्यासही नकार दिल्यामुळे त्यांच्या गर्भवती असल्याच्या चर्चेला जोरदार हवा मिळाली आहे.

वेबदुनिया वर वाचा