कॅफे शौचालय, पहा फोटो

इंडोनेशियाच्या सेमरांगचा हा कॅफे दुनियेचे लक्ष वेधत आहे. हे फोटो कदाचित आपल्या मुळीच आवडणार नाही परंतू ही एक मोहीम आहे.

समाजाची काळजी: प्रत्येक येणार्‍या आधी हैराण होतो पण कॅफे मालक बुडी लाकसोनो प्रमाणे ते समाजाची काळजी म्हणून हे करत आहे. लाकसोनो एक डॉक्टर आहे. इंडोनेशियामध्ये लोकांचे लक्ष स्वच्छ शौचालयाकडे असावे, अशी त्यांची इच्छा आहे.
घातक आहे गलिच्छ शौचालय: बुडी यांची तक्रार आहे की देशात सुमारे अडीच कोटी घरांमध्ये अजूनही शौचालय नाहीत. अस्वच्छतेमुळे लोकं आजारी पडतात आणि देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो.
 

उघड्यात मलविसर्जन: भारत आणि इंडोनेशिया सारखे तिसर्‍या दुनियेच्या देशांमध्ये शौचालय अनुपलब्ध असणे एक मोठी समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे 2014 मध्ये इंडोनेशियामध्ये सुमारे साडे सहा कोटी लोकं उघड्यात शौच करत होते.
सर्वांच्या घरी शौचालय: भारतात सरकारने सर्वाच्या घरी शौचालय बांधण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतू केवळ शौचालय असणे पुरेसे नाही तर त्यांना स्वच्छ ठेवणेही मोठे काम आहे.

वेबदुनिया वर वाचा