आकाशातून नोटांचा पाऊस

वार्ता

सोमवार, 2 जून 2008 (22:27 IST)
इं‍डो‍नेशियाच्या सेरांग शहरात आज एका लेखकाने आकाशातून नोटांचा पाऊस पाडून अनेकांना आश्चर्यचकीत केले.

माथेफिरू लेखक तुंग देसेम वारिंगिन याने आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रचारासाठी विमानातून 10 कोटी रूपयांच्या नोटा हवेत उधळल्या. या नोटा जमा करण्यासाठी हजारो लोकांची रस्त्यावर गर्दी जमा झाली होती.

वारिंगिन या नोटा राजधानी जकार्तावर उधळू इच्छित होता. परंतु, प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे त्याने सेरांग या शहराची निवड केली. याऊलट, इंडो‍नेशियात दिवसाला दोन डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या लाखाच्या घरात आहे.

वेबदुनिया वर वाचा