अमेरिकेत भारतीयांचा सत्याग्रह

भाषा

गुरूवार, 20 मार्च 2008 (21:45 IST)
गुलामासारखे काम करून घेणार्‍या आणि वास्तव्यासाठी कायमचे घर न देणार्‍या भारतीय कामगारांनी दहा लाख अमेरिकन डॉलरची मागणी केली असून याबाबत भारतीय दूतावासाने योग्य निर्णय घेतला नाही तर सत्याग्रह करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

भारत सरकार संरक्षण करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोन करत शेकडो कामगारांनी ऑरलीन्स ते वॉशिंग्टन या मार्गावर मंगळवारी मोर्चा काढला होता. येत्या 26 मार्च रोजी ते भारतीय राजदूत रोनेन सेन यांची भेट घेणार असून कामगारांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल मा‍हिती देणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा