अमेरिकेतील मीडियाची ‘सटकली’

बुधवार, 27 मे 2015 (13:02 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतभेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात गळा घालताना स्तुतिसुमने उधळणार्‍या  अमेरिकेतील मीडियाची सटकली असून मोदी सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले.

मोदींच्या पाठीशी बहुमत असले तरी वस्तुस्थिती तशीच असून फार मोठा बदल करण्यास मोदींना अपयश आल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. उत्पादन क्षेत्रात विकास करण्याच्या इच्छेने मोदी यांनी मेक इन इंडिया मोहीम सुरू केली. जाहिरात करूनही मोदी यांची ही मोहीम फक्त चर्चेत राहिली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते विरोधकांनी मोदी सरकारच्या दोन मोठ्या सुधारणा रोखल्या असून त्यांच्यावर गरीबविरोधी, शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा