अमेरिकेच्या नॅशनल मॉलमध्ये 21 जूनला साजरा करण्यात येईल योगा दिवस

मंगळवार, 12 मे 2015 (17:21 IST)
पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्थित ऐतिहासिक नॅशनल मॉलमध्ये साजरा करण्यात येईल. या दरम्यान भारतीय नृत्य आणि संगीताचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत अरुण कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.  
 
अमेरिकेत भारतीय दूतावास आणि फ़्रेंड्स ऑफ योगा द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन 21 जून रोजी सकाळी साडे आठ ते 11 वाजेपर्यंत करण्यात येईल. या दरम्यान एक्सक्लूजिव व्हिडिओ द्वारे नरेंद्र मोदी यांचे संदेश प्रसारित होईल.  
 
भारतीय राजदूत यांनी सांगितले की हे एक सार्वजनिक आयोजन असेल, ज्यात कोणीही भाग घेऊ शकतं. भारत सरकार अमेरिका समेत जग भरातील सर्व देशांमध्ये योगा दिवस साजरा करण्याची योजना आखत आहे.   

वेबदुनिया वर वाचा