अमेरिकेची पाकला ‘सहकार्य’

शनिवार, 25 जुलै 2015 (13:42 IST)
उत्तर वजिरिस्तानातील लष्करी मोहिम यशस्वी झाल्याने अमेरिकेने पाकिस्तानला ३३.७ कोटींचे ‘सहकार्य’ केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. 

पाकिस्तानला अमेरिकन आघाडी सहकार्य निधीतून हे साहाय्य मिळण्याचे संकेत आहेत. अमेरिकन सरकारने सीएसएफ निधीबाबतची अधिूसचना यापूर्वीच काँग्रेसला दिली असून या आठवडाअखेर १५ दिवसांचा बंधनकारक नोटीस कालावधी संपल्यानंतर पाकला ही रक्कम दिली जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा