अबब...आत्तापर्यंत ६६ धक्के!

मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:27 IST)
नेपाळला शनिवारी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतरही अद्याप भूकंपाचे धक्के सुरु असून आज पहाटे सुमारे ४.३ तीव्रतेचा धक्का बसला.

गेल्या ८० वर्षांतला नेपाळमधील हा सर्वांत मोठा भूकंप आणि विध्वंसकारी असून आत्तापर्यंत जगभरात सुमारे ६६ धक्के जाणवल्याने ही वेगळीच नैसर्गिक आपत्ती असल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात येत आहे.

एखाद्या अणुबॉम्बसारख्या तीव्रतेचा मानला जाणाºया या धक्कयांमुळे नेपाळमधील जनतेचे भय संपलेले नाही. वास्तविक भूकंपाच्या मोठ्या धक्यानंतर काही काळ छोटे-मोठे धक्के जाणवत असतात. मात्र, शनिवारी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतरही रविवार ६.७ आणि सातत्याने ४ पेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के बसत असल्याने अभ्यासकांनाही चक्रावून सोडले आहे. ही वेगळीच नैसर्गिक आपदा असल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात येत आहे. युरोपियन मेडिटेरिअन सिस्मॉलॉजिकल सेंटर अर्थात ईएमएससीच्या मते, नेपाळमध्ये शनिवारी आणि रविवारी आलेल्या भूकंपात एकूण ३९ वेळा धक्के बसले. यांची रिश्टर स्केलवरील तीव्रता ४ हून अधिक नोंदली गेली आहे. यापैकी १५ भूकंपांची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ५ हून अधिक मोजली गेली. ४ रिश्टरवर चारहून अधिक तीव्रता असलेल्या भूकंपाची संख्या रविवारी ६ होती. म्हणजेच ईएमएससीच्या मते, नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांत रिश्टर स्केलवर चार वा अधिक तीव्रता असलेल्या भूकंपाचे ४५ हादरे बसले. एवढेच नाहीतर यादरम्यान जगभरात एकूण ६६ वेळा रिश्टर स्केलवर ४ हून अधिक तीव्रतेचे भूकंप आले.

वेबदुनिया वर वाचा