अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागण्याची शक्यता असून त्यासाठी संयुक्त सुरक्षा समितीने सज्ज राहण्याचा इशारा भारताने दिला आहे. हे होऊ नये यासाठी जागतिक सहकार्याचीही मागणी भारताने केली आहे.
जिनीव्हामध्ये यूएनडीसीच्या 2009 च्या सत्रादरम्यान निःशस्त्रीकरण संमेलनात भारताचे स्थायी प्रतिनिधी हामिद अली राव म्हणाले, की अणू निःशस्त्रीकरणाकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असून ही संहारक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.