अखेर आशियातील सार्क परिषद रद्द झाली

गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (10:02 IST)
जम्मू काश्मिर  येथे झालेल्या उरी बेस वरील  दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्यासाठी भारताना कठोर कारवाई सुरु केली आहे. यामध्ये भारताने आगोदरच दहशतवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधील नोव्हेंबर महिन्यात सार्क परिषदमध्ये  भारताने हजेरी लावणार नाही असे जाहीर केले. हा निर्णय सगळीकडे कळवला त्याचा परिअनम म्हणून इतर देशांनी सुद्धा तेथे जाणे टाळले आहे. त्यामुळे आताची सार्क परिषद रद्द झाली असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. या परिषदेला भारतासह अफगणिस्तान, बांगलादेश, भूतानंही विरोध केला.  
 
सार्क परिषदेचे अध्यक्ष नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नेपाळबाहेर आहेत. त्यामुळे ते परतल्यावर सार्क परिषद रद्द केल्याची औपचारिक घोषणा होणार आहे. 
 
संयुक्त राष्ट्र परिषदेतही दहशतवादी देशांना वाळीत टाकण्याचं वक्तव्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं होतं. त्याची सुरूवात भारतानं सार्क परिषदेतून केली आहे.  
 
सहकार्य आणि शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील, मात्र दहशतीच्या वातावरणात असे संबंध अबाधित राखले जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट मत भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारताने आपला दबदबा आशियात पुन्हा सिद्ध केला असून हा निर्णय सुद्धा आता चीनला चांगलाच जिव्हारी लागला आहे.

वेबदुनिया वर वाचा