भारत पाकवर हल्ला करणार या धास्तीने आणि मुंबई हल्ल्यांवरील लक्ष इतरत्र केंद्रित होण्यासाठी पाकने भारतीय सीमेवर सुरू केलेल्या नाटकाचा पहिला अंक पाकनेच संपवला आहे.
भारताशी युद्ध नको असल्याचे सांगत सीमेवरच पाकचे कदमताल सुरू झाले असून, दुसऱ्या अंकात पाकने आता आपल्यापरीने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची तयारी दर्शवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाक एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई हल्ल्यांतील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मुदत संपल्यानंतर भारत हल्ला करण्याची शक्यता स्वतः:च व्यक्त करत पाक युद्ध तयारीला लागल्याचे पाकने आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शवण्यास सुरुवात केली होती.
अचानक पाकला आपल्या चुकांची उपरती झाली असून, आपल्याला भारताशी मैत्रीचे संबंध हवे असल्याचे सांगतानाच भारताने सांगितले म्हणून नाही तर आम्हालाच दहशतवाद्यांवर कारवाई कराची असल्याचा ढिंढोरा पिटण्यास पाकने सुरुवात केली आहे.