Independence Day Quotes

मंगळवार, 26 जुलै 2022 (16:57 IST)
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.
 
रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सर्व भारतीय एक आहेत.
 
सहिष्णुता आणि स्वातंत्र्यता एक महान राष्ट्राचा पाया आहे.
 
तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने.
 
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.
 
तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.
 
बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
 
स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.
 
अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.
 
ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.
 
देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा
 
मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.
 
आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण
 
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !
 
लढा वीर हो लढा लढा पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा
 
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती