झरीनला हॉलिवूडची ऑफर

IFM
बॉलिवूडची अभिनेत्री झरीन खान हिला हॉलिवूडपटात काम करण्याची ऑफर मिळाली आहे. लेखक डॅनियल सिल्वाचा चित्रपट 'सीमेरा'मद्ये भूमिकेचा प्रस्ताव तिला मिळाला आहे. याबाबत खुद्द झरीननेच सांगितले आहे. मला हॉलिवूडची ऑफर मिळाली आहे, मात्र माझा निर्णय अद्याप पक्का झाला नाही. याबाबत मी अजूनही विचार करीत आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून, यात बिली जेनसुद्धा काम करीत आहे.

मी कथानक वाचले असून, ते मला आवडले आहे, असे जरीन म्हणाली. सीमेरा हा चित्रपट सिल्वा यांची कादंबरी 'द फॉलेन एंजल'वर आधारित आहे. झरीनने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2010मध्ये केली होती.

वेबदुनिया वर वाचा