ऑस्करची पुरस्कार सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या वर्षी ऑस्करसाठी 'व्हाईट टाय' हा ड्रेस कोडचा महत्त्वाचा घटक असणार आहे. आतापर्यंतच्या ऑस्कर सोहळ्यांना हॉलिवूड सेलिब्रिटींनी काळ्या रंगाच्या अर्थातच 'ब्लॅक टाय फॉर्मल्स'ना प्राधान्य दिलं. दरवर्षीच्या काळ्या रंगांच्या टायला थोडं दूर लोटत यंदाचा हा ड्रेस कोड असल्याचं कळत आहे. महिलांसाठी ग्लिटरी गाऊन आणि पुरुषांसाठी टेलकोट, विंगटीप कॉलर आणि व्हाईट टाय असा एकंदर ड्रेस कोड असणार आहे.