ऑस्करमध्ये ‘अ फँटॅस्टिक वुमन’सर्वश्रेष्ठ चित्रपट

सोमवार, 5 मार्च 2018 (11:11 IST)
हॉलीवूड सिनेजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या ‘शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक १३ नामांकने मिळाली आहेत. तर ‘अ फँटॅस्टिक वुमन’सर्वश्रेष्ठ चित्रपट   ठरला आहे. या वर्षीच्या ९०व्या अकादमी अवॉर्डससाठी एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. अभिनेता जिम्मी किमेल यंदा ऑस्करचं सूत्रसंचलन करत आहेत.
 
आतापर्यंत जाहीर झालेले पुरस्कार
 
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग (मूळ गीत) – रिमेम्बर मी (कोको)
 
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर – द शेप ऑफ वॉटर
 
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – ब्लेड रनर 2049
 
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – गेट आऊट
 
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – कॉल मी बाय युअर नेम
 
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) – द सायलेंट चाईल्ड
 
सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
 
सर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क
 
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्लेड रनर 2049
 
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म – डिअर बास्केटबॉल
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
 
सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट – अ फँटॅस्टिक वुमन (चिली)
 
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन – द शेप ऑफ वॉटर
 
सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – डंकर्क
 
सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन – डंकर्क
 
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर – इकरस
 
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – फॅन्टम थ्रेड
 
सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा – डार्केस्ट अवर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती