तसेच सौंदर्य आणि मेकअपबद्दलच्या व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॅलेरिया मार्केझच्या हत्येने देशाला धक्का बसला. २३ वर्षीय व्हॅलेरिया मार्क्वेझ यांच्या मृत्यूची चौकशी स्त्रीहत्या म्हणून केली जात आहे, असे जलिस्को राज्य अभियोक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. मंगळवारी झापोपन शहरातील एका ब्युटी सलूनमध्ये घुसून एका व्यक्तीने मार्केझची गोळी झाडून हत्या केली, असे निवेदनात म्हटले आहे.
२३ वर्षीय व्हॅलेरिया मार्केझचे टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर सुमारे २ लाख फॉलोअर्स होते. ती फॅशन, सौंदर्य आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विषयांवर रील बनवायची आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर तिच्या अनुयायांशी संवाद साधायची.