7. प्रिन्सडॉम ऑफ डोर्न (हाऊस मार्टेल द्वारा शासित)
मुख्य कथा:-
वेस्ट्रॉसचा राजा रॉबर्ट बराथियन आपल्या वजीर च्या मृत्यनंतर आपला विश्वासू मित्र नेड स्टार्कला भेटायला विंटरफेलला येतो. त्याला वजीर बनण्याचे आमंत्रण देतो, त्यासोबतच आपले राजकुमार "जोफरी" चे लग्न नेड स्टार्कच्या मोठी सुपुत्री "सानसा" सोबत ठरवतो. नेड स्टार्क आपल्या बायकोला व मुलांना विंटरफेल मध्ये राहू देतो व दोन्ही मुलीसहित राजधानीत जातो. राजा रॉबर्ट बराथियन च्या अकल्पनिय मृत्यू होते आणि खऱ्या खेळला सुरुवात होती. कमी वयाचा राजकुमार जोफरीला सिंहासन मिळते पण रॉबर्ट बराथियनचा भाऊ स्टांनीस,आपणच सिंहासनाचे खरे वारसदार आहे यासाठी युद्ध पुकारतो. खरं तर रॉबर्ट बराथियन ने वर्षानवर्षो राज्य करणारे टारगॅरियन कुटुंबाला युद्ध मध्ये पराभूत करून सिंहासन काबीज केले असते. टारगॅरियन कुटुंबाचे शेवटचे वंशज डॅनेरीस आणि विसेरीस ने युद्धवेळी पळ काढून इसॉस महाद्वीप मध्ये शरण घेतलेली असती. या पुढे बराथियन,टारगॅरियन, स्टार्क कुटुंबाचे आर्यन थ्रोन सिंहासन मिळवण्यासाठी युद्ध आणि संघर्ष वर मुख्य कथा अवलूंबून आहे. शाही परिवार मधील वंशवाद, राजकारण, निष्ठावात सहकारी, विश्वासघाती हल्ले, वासना, मृत्य नंतर जीवन,थक्क करणारे युद्ध आणि तीन आग ओकणारे ड्रॅगन या मालिकेचे उत्सुकता वाढवतात. बरीच एपिसोड थक्क करणारी आहेत पण सातव्या सत्राचे सहावे एपिसोड मध्ये तुम्हाला खुर्चीला चिटकून राहू वाटेल असा थरार निर्माण केला आहे. जॉन स्नो आणि त्याचे पाच सहकारी एका गोठलेला तलाव च्या मध्य भागी हजारो झोम्बी दानव (व्हाईट वॉकर्स) च्या चक्रव्यूह मध्ये अडकतात, तिथून त्यांची सुटका कशी होती, असा अंगावर शाहारे आणणारा अविस्मरणीय एपिसोड चाहत्यानं मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.