'क्वांटिको'मध्ये प्रियंकाने दिले इंटिमेट सीन (पाहा ट्रेलर)

गुरूवार, 14 मे 2015 (11:59 IST)
बॉलीवूडची बिंदास गर्ल प्रियंका चोप्रा लवकरच एका अमेरिकी टेलिव्हिजन सीरियल 'क्वांटिको'मध्ये दिसणार आहे.  
‘क्वांटिको’ची कथा एफबीआयच्या युवा सदस्याच्या ग्रुपची आहे जे वर्जीनिया स्थित क्वांटिकोमध्ये प्रशिक्षणादरम्यान आपले लक्ष मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. जॅक मॅकलोगलीन, डोग्रे स्कॉट आणि औनजानू एलिस या मालिकेत दिसणार आहे. प्रियंकाने ‘क्वांटिको’मध्ये एफबीआय एजेंट एलेक्स पॅरिशची भूमिका साकारली आहे.  
  
तिच्या समोर परिस्थिती तेव्हा अधिकच खराब होते जेव्हा एक दहशतवादी हल्ला होतो आणि अधिकारी तिच्यावर 9-11नंतर न्यूयॉर्क शहरात झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होण्याचा आरोप लावतात. 
 
प्रियंकाने ट्विटरवर या शो चे ट्रेलर जारी केले आहे. प्रियंकाने ट्विट केले - 'क्वांटिकोचे ट्रेलर आले आहे. नर्वस आहे.’ या मालिकेला जोश साफरान यांनी तयार केले आहे. 'ट्रेलरमध्ये प्रियंका कारमध्ये एका अभिनेत्यासोबत इंटिमेट दृश्य देताना दिसत आहे.

वेबदुनिया वर वाचा