देवाला काय दिले म्हणजे काय मिळते
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (15:06 IST)
१)आवाहन केले = दर्शन लाभते
२)आसन = सुखासन मिळते
३)पाद्य (पाय धूणे) = यश प्राप्ती
४)अर्घ्य (सुगंधीत पाणी) = समाधान प्राप्ती
५)आचमन (गंगाजल) = आनंद मिळतो
६)स्नान घालणे = जिवनात सुख मिळते
७)पंचामृत दिले = माधुर्य व स्नेहप्राप्ती
८)अभिषेक केला = शांतता स्थैर्यप्राप्ती
९)वस्त्र = लाज राखली जाते, अपकीर्ती होत नाही.
१०)यज्ञोपवित (जानवे) = मोक्षप्राप्ती (भवसागरातून सुटका)
११)गंध = ज्ञानप्राप्ति
१२)फुले = सर्वसुखप्राप्ती
१३)हळद पिंजर = सौभाग्यप्राप्ती
१४)अलंकार = श्रीमंती प्राप्त होते
१५)धूप = कीर्ती प्राप्त होते
१६)दीपदान = ज्ञान व वैराग्यप्राप्ती
१७)नैवेद्य = अन्नाची चणचण कधीच भासत नाही
१८)आरती = प्रसन्नता प्राप्त होते
१९)प्रदक्षणा केली = स्वामित्व लाभते
२०)नमस्कार = विनयशिलता प्राप्त होते (वागण्यात)
२१)प्रार्थना = दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते
हे सर्व उपचार मनापासून समर्पण केले तर अहंकार मनात राहत नाही.