गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या.

गुरूवार, 18 मार्च 2021 (08:00 IST)
' सबका मलिक एक ' या नावाने भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईबाबा आपल्या सर्व भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करतात. असं म्हणतात की जर आपण 9 गुरुवार साईबाबांचे उपवास करतात तर आपल्या  मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 
आपल्या सर्व दुखी भक्तांचे सर्व दुःख दूर करणारे साई बाबा त्यांची प्रत्येक इच्छा मग ती नोकरी मिळण्यासाठी ची असो, लग्नासाठी,व्यवसाय चांगला चालण्यासाठी ची असो ,प्रगतीची ,चांगला,पगार होण्याची असो, सर्व इच्छा पूर्ण करतात. 
या साठी माणसाने दर गुरुवारी साईबाबाचे उपवास करून पूजा केली पाहिजे. कोणत्याही शुक्ल किंवा कृष्ण पक्षात कोणत्याही तिथीच्या गुरुवार पासून हे उपास आपण सुरु करू शकता. सतत 9 गुरुवार उपास केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात . 
या शिवाय साईच्या मंत्रांचे जाप केल्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास,दुःख देखील दूर होऊन प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात. 
 
साईबाबांचे विशेष मंत्र-  
1. ॐ साईं राम
 
2. ॐ साईं गुरुवाय नम:
 
3. सबका मालिक एक है
 
4. ॐ साईं देवाय नम:
 
5. ॐ शिर्डी देवाय नम:
 
6. ॐ समाधिदेवाय नम:
 
7. ॐ सर्वदेवाय रूपाय नम:
 
8. ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तनो साईं प्रचोदयात
 
9. ॐ अजर अमराय नम:
 
10. ॐ मालिकाय नम:
 
11. जय-जय साईं राम
 
12. ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा।
 
या विशेष मंत्रांनी साईबाबांचे नाम स्मरण दररोज किंवा दर गुरुवारी सकाळ ,संध्याकाळ करावे , साई बाबा आपले सर्व दुःख आणि त्रास नाहीसे करतील. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती