हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत स्त्रिया?

हनुमान ब्रह्मचारी होते हे सर्वांना माहीत असले तरी शास्त्रांमध्ये त्यांच्या विवाहाचं वर्णन मिळतं. परंतू हा विवाह हनुमानाने वैवाहिक सुख प्राप्तीसाठी केले नव्हते. हे विवाह त्यांनी त्या 4 प्रमुख विद्या प्राप्त करण्यासाठी केले होते ज्यांचे ज्ञान केवळ विवाहित लोकांना दिले जात होते.
 
या कथेप्रमाणे हनुमानाने सूर्य देवतेला आपले गुरू मानले होते. सूर्य दैवताने नऊ प्रमुख विद्यांमधून पाच विद्या आपल्या शिष्ट हनुमानाला शिवल्या परंतू इतर चार विद्या देण्यापूर्वी त्यांनी हनुमानाला विवाहाचा आदेश दिला. तेव्हा हनुमानाने विवाह करण्याचा निश्चय केला. विवाहासाठी कन्येच्या निवड करण्याची समस्या उद्भवली. तेव्हा सूर्य दैवताने आपली परम तेजस्वी पुत्री सुवर्चला हिच्यासोबत हनुमानाचे लग्नाचा प्रस्ताव मांडला. हनुमान आणि सुवर्चला यांचा विवाह झाला. सुवर्चला परम तपस्वी होती आणि विवाहानंतर ती तपस्येत मग्न झाली. इकडे हनुमान इतर चार विद्या प्राप्त करण्यात लीन झाले. अशा प्रकारे विवाहित असूनही हनुमानाचे ब्रह्मचर्य व्रत मोडले गेले नाही.
 
हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिला आहे. या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वत:ला नमस्कार करू पाहणे योग्य समजत नाही. ते स्वत: ‍स्त्री शक्तीला नमन करतात. मनात श्रद्धा असल्यास ‍महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकते, स्तुती करू शकते, प्रसाद अर्पित करू शकते. परंतु 16 उपचारांमध्ये ज्यात चरण स्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र, चोला चढवणे व इतर, या सर्व सेवा महिलांद्वारे करवणे हनुमानाला स्वीकार नाही.

वेबदुनिया वर वाचा