कांद्याला कृष्णावळ का म्हणतात, ही माहिती ठाऊकच नव्हती
बुधवार, 9 जून 2021 (09:27 IST)
कांदा याला हिंदी भाषेत प्याज तर इंग्रेजीत ओन्यन किंवा अन्यन (onion) असं म्हणतात. हे कंद श्रेणीत येतं आणि याची भाजी बनते तसेच इतर भाज्यांमध्ये याचा मसाला तयार करुन पदार्थ बनवले जातात. याला संस्कृतमध्ये कृष्णावळ म्हणतात. तथापि हा शब्द हल्ली प्रचलित नाही. तरी कृष्णावळ या शब्दामागे एक रहस्य आहे तर जाणून घेऊया कांद्याला कृष्णावळ का म्हणतात ते-
1. दक्षिण भारतात, विशेषत: कर्नाटक आणि तामिळनाडूच्या ग्रामीण भागात, कांदा अजूनही कृष्णावळ या नावाने ओळखला जातो.
2. त्याला कृष्णावळ म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा कांदा उभा कापला जातो तेव्हा तो शंखाकृती अर्थात शंखच्या आकृतीत कापला जातो. त्याच वेळी, जेव्हा तो आडवा कापला जातो तेव्हा तो वर्तुळाच्या आकारात कापला जातो.
3. आपल्याला आधीपासूनच माहित आहे की शंख आणि चक्र हे दोन्ही श्रीकृष्णाच्या आठव्या अवतार विष्णूंच्या शस्त्रांशी संबंधित आहेत.
4. शंख आणि चक्र या कारणामुळेच कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय शब्द मिळून कृष्णावळ शब्द तयार झाला आहे.
5. कृष्णावळ म्हणण्यामागे केवळ हेच एक कारण नव्हे तर जर आपण कांदा त्याच्या पानांसह उलटा धरला तर तो गदा रुपात दिसेल. पत्त्यांशिवाय तो पद्म अर्थात कमळाचा आकार घेतो. गदा आणि पद्म देखील प्रभू विष्णु चक्र आणि शंख याोबत धारण करतात.
उल्लेखनीय आहे की नुकतचं सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या देवी अहिल्या या मालिकेत ही माहिती सांगितली गेली आहे. अहिल्याला तिच्या सासू गौतमा राणीने विचारले की घरात कृष्णावळचे नाव काय आहे.
(ही सामग्री पारंपारिकपणे मिळविलेल्या माहितीवर आधारित आहे, वेबदुनिया याची पुष्टी करत नाही, वाचकांनी स्व: विवेकानुसार निर्णय घ्यावा.)