त्या दरम्यान गुडाकेशाने विष्णूंकडे वर मागितले की- आपल्या चक्राने माझ्या मृत्यू व्हावा आणि माझं पूर्ण शरीर तांब्यात परिवर्तित व्हावे. त्या तांब्याचा वापर पूजेसाठी वापरण्यात येणार्या भांडीत व्हायला हवं आणि त्या धातूच्या भांड्याने आपली पूजा केल्यास आपण प्रसन्न व्हावे. यामुळे तांबा अत्यंत पवित्र धातू होईल.
प्रभू विष्णूंनी गुडाकेशाला वर दिले आणि वेळ आल्यावर चक्राने त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ज्यानंतर गुडाकेशाच्या मासाने तांबा, रक्ताने सोनं आणि हाडांनी चांदी निर्मित झाली. या कारणामुळे प्रभूच्या पूजनात नेहमी तांब्याची भांडी वापरणे सुरू झाले.