नवरात्रीत लग्न का केले जात नाही?

नवरात्र हे पवित्रता आणि शुद्धतेने जोडलेले असते असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कपडे धुणे, शेविंग करणे, केस कापणे आणि पलंग किंवा खाटावर झोपणे यास देवीचे भक्त वर्ज्य करतात. तसेच या दिवसात लग्नकार्यही केले जात नाही. तर, जाणून घेऊया नवरात्रीत पाळल्या जाणार्‍या अशाच काही इतर धारणांबद्दल आणि त्यामागच्या कारणांविषयी.
 
सातूचे बीज रोवणे
नवरात्रीत देवीच्या आराधनेला जोडून अनेक मान्यता आहेत. त्यातीलच एक म्हणजे घटस्थापना. घटस्थापना करण्यापासून देवीच्या 9 दिवसांच्या पूजेची सुरूवात होते. घटनेस्थापनेच्या दिवशी सातूचे बीज रोवले जाते. असे मानले जाते, की जेव्हा सृष्टीची सुरूवात झाली होती तेव्हा सातू हे पहिले पीक होते. वसंत ऋतूतील पहिले पीक हे सातू असते. त्यामुळे यास भविष्य अन्नही म्हटले जाते. तसेच नवरात्रीतील सातूचे पीक लवकर वाढले तर घरात सुख-सृद्धी तेजीने वाढते अशीही धारणा आहे. परंतु, या धारणोगची मूळ भावना अशी, की देवीच्या आशीर्वादाने संपूर्ण घर वर्षभर धनधान्यांनी भरलेले असावे. 
 
देवीची रात्रीच्या वेळेस पूजा करणे
शास्त्रानुसार, रात्रीच्या वेळेत देवीची पूजा करणे महत्त्वाचे असते. कारण देवी रात्रीस्वरूप असते तर शिव दिनस्वरूप असतात. त्यामुळे नवरात्रीत रात्री या शब्दाचा उल्लेख होतो. भक्ती आणि श्रद्धेने देवीची पूजा दिवस आणि रात्र दोन्हीवेळा केली जाऊ शकते. शिव आणि शक्ती या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे भेद नाही. परंतु एवढे लक्षात ठेवा, की या दिवसात 9 देवींची पूजा अवश्य करावी. 
 
कुमारी कन्यांची पूजा करणे
कुमारी कन्यांना देवीसमानच पवित्र आणि पूजनीय मानले जाते. हिंदू धर्मात 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना साक्षात देवीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळेच नवरात्रीत या वयाच्या मुलींचे विधिवत पूजन करून त्यांना भोजन दिले जाते. शास्त्रानुसार, एका कन्येच्या पूजेने ऐश्र्वर्य, दुसर्‍या कन्येच्या पूजेने भोग आणि मोक्ष, तिसर्‍या कन्येच्या पूजेने धर्म, अर्थ आणि काम, चौथ्या कन्येच्या पूजेने राज्यपद, पाचव्या कन्येच्या पूजेने विद्या, सहाव्या कन्येच्या पूजेने सिद्धी, सातव्या कन्येच्या पूजेने राज्य, आठव्या कन्येच्या पूजेने संपदा आणि नवव्या कन्येच्या पूजेने पृथ्वीवर प्रभुत्व मिळवता येते.
 
लग्नकार्य केले जात नाही
नवरात्रीदरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी व्रत केले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसात पवित्रता आणि सात्विकता ठेवून देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते. तसेच त्यामुळे नवरात्रीत गृहप्रवेश करणे असो किंवा एखादे शुभ कार्य करणे यास लोकांची पसंती असते. परंतु यादिवसात लग्नकार्य करण्यास लोकांचा विरोध असतो. याचे मूळ कारण असे, की विष्णुपुराणानुसार नवरात्रीत व्रत करण्यादरम्यान स्त्रीसोबत सहवास केल्याने व्रत खंडित होते. तसेच असेही मानले जाते, की लग्नकार्य करण्याचा मूळ उद्देश संततीद्वारा वंशाला पुढे नेणे हा असतो. त्यामुळे नवरात्रीत लग्र केले जात नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती