Rath Yatra 2022 भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलराम यांच्या मूर्ती अपूर्ण का ? रहस्य जाणून घ्या

मंगळवार, 28 जून 2022 (11:18 IST)
भगवान जगन्नाथाची पवित्र रथयात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या जगप्रसिद्ध यात्रेत सामील होण्यासाठी येतात. तुम्हाला माहिती आहे की ही यात्रा स्वतःच खूप वेगळी आहे कारण ही भारतातील पहिली पूजा आहे जी कृष्णाची प्रेयसी राधा किंवा पत्नी रुक्मिणीसोबत नाही तर त्यांची बहीण सुभद्रा आणि मोठा भाऊ बलदाऊ यांच्यासोबत पूजा केली जाते. तर भाऊ आणि बहिणी एकत्र पूजा अजून कुठेही केली जात नाही.
 
अपूर्ण मूर्ती
या यात्रेशी निगडित आणखी एक विशेष गोष्ट आहे आणि ती म्हणजे या प्रवासात अपूर्ण मूर्तीची पूजा केली जाते, तर सामान्यतः अपूर्ण मूर्तीची पूजा केली जात नाही. परंतु येथे शतकानुशतके अपूर्ण मूर्तीची पूजा केली जात आहे, त्यामागे एक विशेष कारण आहे. खरे तर पुरीच्या मंदिरात ठेवलेल्या भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलराम यांच्या मूर्ती पूर्ण नाहीत, त्यांचे हात-पाय नसून केवळ मुख बनवलेले आहे. त्यामागे एक कथा आहे.
 
देव शिल्पी विश्वकर्मा यांना मूर्ती घडवण्याचे काम मिळाले
पौराणिक कथेनुसार, एकदा पुरीचा राजा इंद्रद्युम्न याने भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलराम यांच्या मूर्ती बनवण्याचे काम देव शिल्पी विश्वकर्मा यांच्याकडे सोपवले होते, परंतु शिल्पीने राजासमोर एक अट घातली की, जोपर्यंत मूर्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते एका खोलीत राहतील आणि तेथे कोणालाही येण्याची परवानगी नसेल.
 
कारागीर विश्वकर्मा गायब
यावर राजाने शिल्पीला होकार दिला. ते दररोज शिल्पीच्या घराच्या बाहेरहून निघयाचे जिथे त्यांना मूर्ती घडवण्याची आवाज ऐकू येत असे. एके दिवशी ते शिल्पीच्या घरासमोरून जात असताना त्यांना कुठलाही आवाज आला नाही. ते जरा काळजीत पडले आणि त्यांनी शिल्पीच्या घराचे दार उघडले, राजा शिल्पीच्या घरात प्रवेश करताच कारागीर विश्वकर्मा गायब झाले आणि पुन्हा कधीही दिसले नाही. आता राजा इंद्रद्युम्न यांना पुरीच्या मंदिरात भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलरामाच्या तीन मूर्ती आणायला भाग पाडले आणि तेव्हापासून पुरीत अपूर्ण मूर्तींची पूजा केली जात आहे.
 
पण असं म्हणतात की श्रद्धा सगळ्यांपेक्षा मोठी असते आणि प्रेमात सगळ्यात जास्त ताकद असते त्यामुळे इथे येणारे भाविक फक्त देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवून या अपूर्ण मूर्तींना पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होऊन आपल्या प्रत्येक समस्येवर उपाय मागतात. ज्याचे समाधान भगवान जगन्नाथ त्यांना प्रत्येक परिस्थितीत देतात. देवाच्या या मूर्तींवर भक्तांची अतूट श्रद्धा आहे, जिथे फक्त डोके श्रद्धेने नतमस्तक होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती