रात्रीच्या वेळेस हे तीन काम करणे टाळावे

बुधवार, 5 डिसेंबर 2018 (00:59 IST)
सुख, शांती आणि समृद्धी कायम राहिला पाहिजे या साठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे की आम्हाला कोणत्या वेळेत कोणते काम नाही करायला पाहिजे. येथे जाणून घेऊ विष्णू पुराणानुसार 3 अशा गोष्टी ज्यांना रात्री करू नये …
 
विष्णू पुराणात सांगण्यात आलेल्या गृहस्थ संबंधी नियमांचे पालन केल्याने विष्णू, महालक्ष्मी समेत सर्व देवी देवतांची कृपा तुम्ही प्राप्त करू शकता. येथे जाणून घ्या बुद्धिमान व्यक्तीला रात्रीच्या वेळेस कुठल्या तीन कामांपासून दूर राहिला पाहिजे…
 
1. चौरस्त्यावर नाही जायला पाहिजे
कुठल्याही समजदार व्यक्तीला रात्रीच्या वेळेस चौरस्त्यापासून दूर राहिला पाहिजे. रात्रीच्या वेळेस नेहमी चौरस्त्यावर असामाजिक तत्त्वांची उपस्थिती असते. अशात जर एखादा सज्जन व्यक्ती चौरस्त्यावर जाईल तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेही हे काम सदाचाराच्या नियमांच्या विरुद्धपण आहे. रात्रीच्या वेळेस आपल्या घरातच राहिला पाहिजे.
 
2. स्मशानाजवळ नाही जायला पाहिजे
रात्रीच्या वेळेस स्मशानाच्या जवळपास नाही जायला पाहिजे. स्मशान क्षेत्रात नेहमी नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. याचा वाईट प्रभाव आमच्या मन आणि मस्तिष्कावर देखील पडतो. तसेच, स्मशान क्षेत्रात जळत असलेले शवांमधून निघणारा धूर देखील आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्या क्षेत्राच्या वातावरणात बरेच सूक्ष्म कीटाणु देखील राहतात जे आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणून स्मशानातून आल्यावर अंघोळ करणे फारच गरजेचे आहे. याच कारणांमुळे रात्रीच्या वेळेस स्मशानात नाही जायला पाहिजे.
 
3. वाईट चरित्र असणार्‍या व्यक्तीपासून दूर राहणे गरजेचे आहे
तसे तर वाईट चरित्र असणार्‍या व्यक्तीपासून नेहमी दूरच राहिला पाहिजे, पण रात्रीच्या वेळेस या गोष्टींकडे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. वाईट चरित्र असणारे लोक जास्तकरून अधार्मिक आणि चुकीचे कार्य रात्रीच्या वेळेसच करतात. अशात जर कोणी सज्जन व्यक्ती त्यांच्यासोबत असेल तर तो देखील अडचणीत येऊ शकतो. म्हणून रात्रीच्या वेळेस या लोकांपासून दूर राहणेच योग्य.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती