विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
शुक्रवार, 5 मार्च 2021 (14:35 IST)
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते.
2. हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो अर्थात कधी शत्रूपासनू पीडा होत नाही. ही एकादशी आपल्याला नावाप्रमाणे फल प्रदान करते. या दिवशी व्रत धारण केल्याने व्यक्तीला इच्छित फल प्राप्ती होते आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्ती होते.
3. एकादशी व्रत केल्याने चंद्र ग्रह शुभ होऊन चांगलं फल देतं, ज्याने व्यक्ती मानसिक रुपाने निरोगी राहतो.
4. एकादशी व्रत केल्याने व्यक्तीचे अशुभ संस्कार नष्ट होतात. ही एकादशी सर्व पापांचे हरण करणारी तिथी असल्याचे म्हटले गेले आहे.
5. पुराणांनुसार जी व्यक्ती एकादशी व्रत करतात त्यांच्या जीवनात कधीही संकटं येत नाही आणि धन आणि समृद्धी नांदते. हे व्रत जीवनात यश मिळवण्यिासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलं जातं.
7. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी व्रत केल्याने पूजेचं तीनपट फल मिळतं.
8. लंकावर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी याच दिवशी समुद्र काठी पूजा केली होती.
9. विजया एकादशीला श्रीराम आणि त्यांच्या सेनेद्वारा व्रत ठेवण्याची कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला ऐकवली होती.
10. पद्मपुराण या अनुसार या एकादशीला व्रत ठेवल्याने व्यक्तीवर कोणत्याही प्रकाराचे संकट येत नसून सर्व कार्य सोपारीत्या पूर्ण होतात.