तुळशीची माळ कधी घालायची
तुळशीची माळ घालण्यासाठी प्रदोष काळ हा उत्तम काळ मानला जातो. यासोबतच सोमवार, गुरुवार किंवा बुधवारीही तुळशीची माळ घातली जाऊ शकते. मात्र रविवारी आणि अमावस्येला परिधान करू नये. त्याचबरोबर ही जपमाळ गरोदरपणातही घालू नये. तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊन शुभ मुहूर्तावर तुळशीची माळ देखील धारण करू शकता.
आहाराचे नियम
तुळशीची माळ धारण करणाऱ्या व्यक्तीने कधीही मांस, मद्य आदींचे सेवन करू नये. यासोबतच लसूण आणि कांद्याचे सेवन टाळावे, अन्यथा तुळशीच्या जपमाळाचा लाभ मिळणार नाही. त्याऐवजी नेहमी फक्त सात्विक आहार घ्या.