अंघोळ करताना कोणता अंग आपण आधी धुतो, ते ही तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगतात

बुधवार, 27 मार्च 2019 (15:48 IST)
जास्तकरून आम्ही सर्वच आपल्या दिवसाची सुरुवात स्वत:ची स्वच्छता आणि अंघोळ करून करतो. पण तुम्हाला हे ठाऊक नसेल की तुमच्या अंघोळ करण्याची पद्धत देखील तुमची व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते. एक व्यक्ती ज्या प्रकारे अंघोळ करतो हे जरूरी नाही आहे की दुसरा व्यक्ती देखील त्याच पद्धतीने अंघोळ करत असेल.
याकडे कधीच लक्ष्य दिले नसेल की तुम्ही नेहमी अंघोळीसाठी तुमच्या बनवलेल्या पद्धतीनेच अंघोळ करता आणि अंघोळ करताना नेहमी शरीराच्या त्या एका भागापासून सुरू करता. नकळत तुम्ही अंघोळ करताना शरीरातील ज्या भागाची निवड केली तोच भाग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगतो.  
 
1. चेहरा : जर तुम्ही अंघोळ करताना सर्वात आधी तुम्ही तुमचा चेहरा धूत असाल तर तुम्ही असे व्यक्ती आहात जी आपले पाच बेसिक सेंस (चव, गंध, स्पर्श, पाहणे आणि ऐकणे) वर भरवसा करणे पसंत करता. दुसरे व्यक्ती तुम्हाला कसे पाहतात याचा तुमच्यावर फार फरक पडतो. यामुळे तुम्ही नेहमी तुमचा चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असतात कारण तुम्हाला हे माहीत आहे की लोक सर्वात आधी तुमचा चेहरा बघतात.
2. हात आणि पाय : जेव्हा तुम्ही अंघोळी दरम्यान सर्वात आधी आपले हात आणि पायांना स्वच्छ करता तर असे सांगण्यात येते की तुम्ही फार नम्र, साधे आणि जमिनीशी जुळलेले व्यक्ती आहात. तुमचे हे अंग मजबुतीचे प्रतीक आहे. पण हे तुमच्या विनम्रतेला दर्शवतात आणि सांगतात की तुम्ही चकाचकमध्ये कधीत हरवत नाही. तुम्ही तुमची गोष्ट फारच मजबूतरीत्या मांडता.
3. प्रायवेट भाग : जर तुम्ही अंघोळ करताना सर्वात आधी आपल्या प्रायवेट अंगांना स्वच्छ करता तर हे दर्शवले जाते की तुम्ही फार लाजाळू आणि संकोची स्वभावाचे आहात. तुम्ही असे व्यक्ती आहात ज्याला स्वत:चे मत मांडण्यासाठी देखील फार संघर्ष करावा लागतो. पण तुमच्यात ही खासियत आहे की आपल्या जवळपासच्या लोकांना तुम्ही कम्फर्टेबल जाणवून देता.
4. छाती : हा तुमच्यातील आत्मविश्वास आहे ज्यामुळे शावर खाली जाताच तुमचे हात छातीकडे जातात. तुम्ही जसे आहे त्यातच कम्फर्टेबल आहात. तुम्ही तुमचे विचार आणि मत सरळ शब्दांमध्ये सांगणे पसंत करता. तुमची व्यक्तिमत्व फार व्यावहारिक आहे. तुम्ही आत्मनिर्भर असून दुसर्‍यांना देखील प्रभावित करता. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्यासाठी तुम्ही फार मेहनत करता.
5. केस : जर तुम्ही शावर खाली गेल्याबरोबर तुमचे केस स्वच्छ करू लागता तर तुम्ही असे व्यक्ती आहात जे नियम, कायदा इत्यादी मानणारे असतात. तुम्ही अंघोळीसाठी शरीरातील कोणत्याही भागातून सुरुवात न करता सरळ केसांपासून सुरू करता. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील हाच ढाचा फॉलो करता. तुम्ही फार प्रॅक्टिकल व्यक्ती आहात. तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल मजबूत ओपिनियन ठेवता आणि तुम्हाला असे वाटते की तुमचं मस्तिष्क तुमचे सर्वात मोठे साथी आहे.
6. खांदा आणि मान : तुम्ही फार मेहनती व्यक्ती आहात. तुम्ही अंघोळ करताना सर्वात आधी खांदे आणि मानेपासून सुरुवात करता कारण हे तुमच्या शरीरातील सर्वात जास्त स्ट्रेसफुल भाग आहे. तुम्ही प्रत्येक कामासाठी फार मेहनत घेता आणि त्यामुळेच नेहमी स्ट्रेसमध्ये राहता. तुमच्यात प्रतिस्पर्धेची भावना जास्त असते आणि तुम्हाला नेहमी सर्वांपेक्षा पुढे राहणे आवडते.
 

7. पाठ : काय तुम्ही खरंच सर्वात आधी आपली पाठ स्वच्छ करता. अर्थात तुम्ही दुसर्‍यांवर लवकर भरवसा करत नाही. तुम्ही कुठल्याही दुसर्‍या व्यक्तीला आपल्या जीवनात लगेचच येऊ देत नाही. ह्याचे मुख्य कारण असे ही आहे की तुम्ही जीवनात फार धोके पत्करले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती