बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे काम करा, सुख-समृद्धी मिळेल
बुधवार, 2 मार्च 2022 (07:30 IST)
Shri Ganesh Sankat Nashan Stotra: हिंदू धर्मात भगवान गणेशाला बुद्धी, शक्ती आणि ज्ञान देणारे म्हटले जाते. बुधवार गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाची पूजा आणि आशीर्वादाने केली जाते.
बुधवारी कोणत्याही कामात येणारी बाधा दूर करण्यासाठी आणि गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश स्तोत्रम पठण करावे. बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीची पूजा करावी. त्यांना दुर्वा अर्पण कराव्या. गणेशजींना त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर श्री गणेश स्तोत्रमचे पठण करावे.
नारदजींनी हे पाठ केले होते
धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की देवर्षी नारदजींनी प्रथम श्री गणेश स्तोत्रम् पाठ केले. नारद पुराणात श्री गणेश स्तोत्रमला गणपती संकटनाशन स्तोत्र असेही म्हणतात. जीवनातील संकटे नष्ट करण्यासाठी याचे पठण केले जाते. त्याचे पठण केल्याने शुभतेचा प्रभाव वाढतो.