दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र सईज या गावी (ता. कलोल, जि. मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ;
श्री दत्तबावनी
जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.
निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.
एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||
संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.
यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.
रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.
बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.
अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.
सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.
वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!
थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा?
अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन जय जय श्री गुरुदेव म्हणावे