श्री भक्तविजय अध्याय ५२

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजगदीश्वराय नमः ॥    
जय जय भक्तकरुणाकरा ॥ अक्षय अभंगा जगदुद्धारा ॥ आदिस्तंभा सायुज्यउदारा ॥ रुक्मिणीवरा श्रीविठ्ठला ॥१॥
तूं जया पाहसी कृपादृष्टी ॥ त्याची तुटे भवबधफांसोटी ॥ करूनि प्रपंचाची तुटी ॥ देसी शेवटीं अक्षयपद ॥२॥
तुझें उदारत्व वर्णितां पाहें ॥ सहस्रमुखातेंही लेखा नोहे ॥ महाकवीची मति कुंठित होये ॥ तेथें मी काये मशक ॥३॥
परी आवडीची ऐसी जाती ॥ बाळकें मातेसी भलतें बोलती ॥ परी जननीस त्याची न वाटे खंती ॥ ऐकूनि तुष्टे ती निजलोभें ॥४॥
तेवीं कृपा करूनि जगज्जीवनें ॥ अंगीकारावीं आर्ष वचनें ॥ हेंचि मागतों तुजकारणें ॥ परी तुझेचि सत्तेनें दयाळा ॥५॥
सागरींचें जीवन मेघ आणिती ॥ ते सरित घेऊन समुद्रासी जाती ॥ तरी उपकार कोण तयांप्रती ॥ ज्याचें त्यास अर्पितां ॥६॥
भास्कराचें जावें भेटीसी ॥ तरी त्याचेच प्रकाशें पाहावें त्यासी ॥ तेवीं तुज प्रार्थावया हृषीकेशी ॥ सत्ता आम्हांसी असेना ॥७॥
कीं पृथ्वीस केला नमस्कार ॥ आणि तिजवर पडेच शरीरभार ॥ तेवीं तुज वर्णावया साचार ॥ आणिक आधार असेना ॥८॥
नातरी विनवावें प्रभंजनास ॥ तरी त्याच्याच योगें निघती श्वास ॥ तेवीं तुझीं चरित्रें यावया वाचेस ॥ कारण तूंचि अससी पैं ॥९॥
कीं अग्नीस धूप दाखविला जर ॥ तरी त्याचेच योगें निघे धूर ॥ तेवीं तुझ्याच योगें चित्त होतें स्थिर ॥ निघती उद्गार कथेचे ॥१०॥
गंगेसी केला अभिषेक ॥ परी तिजचिपासाव घेतलें उदक ॥ तेवीं तुझिया प्रसादें देख ॥ कवि अनेक वर्णिती ॥११॥
नातरी चंद्र आला उदयास ॥ त्याच्याच प्रकाशें पाहावें त्यास ॥ कां मातेची सेवा केली विशेष ॥ तरी शरीर असे जननीचें ॥१२॥
सुरतरूखालीं बैसोन ॥ कल्पनेकरूनि त्यासी घातलें जीवन ॥ मग आपण उपकार दाखवितां जाण ॥ लज्जित सज्ञान होतसे ॥१३॥
तेवीं तुझिया सामर्थ्यें रुक्मिणीपती ॥ वेदीं वर्णिली अपार स्तुती ॥ मग विवेक करूनि आपुले मती ॥ नेति नेति वदले कीं ॥१४॥
ऐसा स्वसामर्थ्यें तूं अधोक्षज ॥ जाणसी दासांचें अंतरगुज ॥ आतां अभय वर देऊन मज ॥ वदवीं निजभक्तविजयकथा ॥१५॥
मागील अध्यायाचे  अंतीं ॥ देहूस आले रुक्मिणीपती ॥ सगुण रूप धरूनी निश्चितीं ॥ तुकयासी प्रीतीं भेटले ॥१६॥
मग प्रसन्न होऊनि जगज्जीवन ॥ म्हणती कांहीं माग वरदान ॥ जें विरिंचीस न लाभे करितां प्रयत्न ॥ तें मी देईन तुजलागीं ॥१७॥
यवरी तुका देत उत्तर ॥ म्हणे चित्तीं न पडावा तुझा विसर ॥ गुण गाईन वारंवार ॥ सप्रेम अंतरीं होउनी ॥१८॥
आणि तुझे निजभक्त अंतरंग ॥ अखंड असावा त्यांचा संग ॥ हेंच मागतों आला प्रसंग ॥ न करीं मनोभंग दयाळा ॥१९॥
तुझें भजनीं असावी प्रीती ॥ न लगे कांहीं धनसंपत्ती ॥ पुढें करिसील चारी मुक्ती ॥ तरी त्या नावडती मजलागीं ॥२०॥
अखंड संतसमागम ॥ वाचेसी असावें तुझें नाम ॥ मग गर्भवास असतां संभ्रम ॥ होय सुगम सर्वदा ॥२१॥
हेंचि मागणें रुक्मिणीपती ॥ म्हणोनि नमन केलें पुढती ॥ ऐसें ऐकोनि वैकुंठपती ॥ आश्चर्य चित्तीं करीतसे ॥२२॥
मग गरुडासी म्हणे भक्तसखा ॥ उदास विरक्त प्रेमळ तुका ॥ येणें सर्वं त्याग करूनि देखा ॥ मजचि एका आराधिलें ॥२३॥
माझिया वियोगदःखेंकरून ॥ अन्न उदक वर्जिले जाण ॥ म्हणोनि देह कृश होऊन ॥ गेला वाळून पाहें तुका ॥२४॥
यावरी बोले विनतासुत ॥ तुम्हीं आशीर्वाद लिहिला पत्रांत ॥ कीं जोंवरी वैकुंठ कैलास दिसत ॥ तोंवरी चिरंजीव असावें ॥२५॥
तें आपुलें वचन वैकुंठपती ॥ असत्य नव्हेचि कल्पांतीं ॥ तरी शरीर वाळलें म्हणोनि प्रीतीं ॥ उद्विग्न चित्तीं कां होतां ॥२६॥
भजनीं रतलें याचें चित्त ॥ तेव्हांचि कळिकाळ जाहला अंकित ॥ नामयाचा अवतार साक्षात ॥ जाणती संत निजखूण ॥२७॥
अनंत जन्मीं करूनि भजन ॥ एकाग्र निश्चळ करूनि मन ॥ तुम्हांसी केलें आपुलें स्वाधीन ॥ वर्णितो गुण निजप्रीतीं ॥२८॥
यावरी तुकयासी म्हणे जगजेठी ॥ मी क्षुधित जाहलों बहु पोटीं ॥ उपवासी निघूनि उठाउठीं ॥ तुझिय भेटी पातलों ॥२९॥
तरी गृहांत निपजलें असेल अन्न ॥ तें पात्रीं आणावें विस्तारूनि ॥ ओलें कोरडें म्हणोन ॥ संकोच मनीं न धरावा ॥३०॥
म्हणाल सन्निध असतां रुक्मिणी ॥ क्षुधित कां झाले चक्रपाणी ॥ तुकयाचा हेत होता मनीं ॥ कीं देवा भोजनीं बैसवावें ॥३१॥
तें मनोगत जाणोनि त्वरित ॥ तैसेंचि वदले पंढरीनाथ ॥ जेणें प्रेमळाचा पुरे हेत ॥ तेंचि दीननाथ करीतसे ॥३२॥
मग तुकयानें आणोनि जळ ॥ धुतलें देवाचें चरणकमळ ॥ कोमल तुलसीदलांची माळ ॥ कंठीं तत्काळ घातली ॥३३॥
अत्यंत प्रीतीं करूनि नमन ॥ मग पात्रीं वाढूनि आणिलें अन्न ॥ शुष्क भाकरी भाजीपान ॥ शाकेसी लवण दुसरें असे ॥३४॥
तें आवडीनें खात जगज्जीवन ॥ ऐकोनि आशंका धरितील सज्जन ॥ म्हणतील क्षीराब्धिवासी नारायण ॥ कोरडें कदन्न खातसे ॥३५॥
तरी एक सद्भाव असतां अंतरीं ॥ तेथेंचि क्षुधित होय श्रीहरी ॥ मग याति कुळ न विचारी ॥ निजप्रीतीं बरी देखोनियां ॥३६॥
पक्वान्नें करूनि नाना रीतीं ॥ वाट पाहे दुर्योधन कुमती ॥ परी तेथें न जेवितां श्रीपती ॥ कण्याचि खाती विदुराच्या ॥३७॥
कीं द्रौपदेनें सद्भावें पाहतां वाट ॥ जेवितां लोटूनि दिधलें ताट ॥ मग धांवत येऊनि बैसले निकट ॥ मागत देंठ भाजीचा ॥३८॥
जो यज्ञपुरुष अति निर्मळ ॥ तो उच्छिष्ट गवळियांचें खातो बळें ॥ भिल्लिणीचीं उच्छिष्ट फळें ॥ भक्षी घननीळ निजप्रीतीं ॥३९॥
तो तुकयाचें घरीं कदन्न भक्षितां ॥ येथें आश्चर्य कोणतें चित्ता ॥ म्हणोनि साशंक न व्हावें श्रोतां ॥ पुरातन कथा ऐकोनी ॥४०॥
असो रुक्मिणीसहित जगज्जीवन ॥ आवडीं बैसोनि केलें भोजन ॥ करशुद्धी देऊनि तुकयान ॥ उच्छिष्ट आपण भक्षिलें ॥४१॥
देवासी मुखशुद्धीसी ते वेळ ॥ आणूनि दिधलें तुळसीदळ ॥ आवडी देखोनि दीनदयाळ ॥ अति आदरें भक्षिती ॥४२॥
यापरी होऊनि संतुष्टी ॥ मग तुकयासी बोले जगजेठी ॥ आतां मज ठेवूनि हृदयसंपुटीं ॥ वियोगहिंपुटी न व्हावें ॥४३॥
तूं बोलाविसील जैं मज ॥ तैं सगुण स्वरूपें भेटेन तुज ॥ ऐसें म्हणोनि अधोक्षज ॥ जाते जाह्ले तेधवां ॥४४॥
तुकयानें धांवूनि ते वेळीं ॥ मस्तक ठेविला चरणकमळीं ॥ मग रुक्मिणीसहित वनमाळी ॥ पंढरपुरासी पातला ॥४५॥
तंव एक ब्राह्मण कामना धरूनी ॥ आळंदीस अनुष्ठानी बैसला ॥ म्हणे पुराणव्युत्पत्ति व्हावी मजलागुनी ॥ मनीं अखंड चिंतित ॥४६॥
मग दृष्टांत दाविला ज्ञानेश्वरें ॥ कीं तुकयापासीं जाय तूं त्वरें ॥ तो तुज भेटोनि एकांतीं ॥ कामना चित्तीं सांगितली ॥४८॥
म्हणे म्यां अनुष्ठान केलें अलकावतीसीं ॥ ज्ञानदेवें पाठविलें तुम्हांपासी ॥ वचनें ऐकोनियां ऐसीं ॥ तुका मानसीं विस्मित ॥४९॥
कांहीं पुण्य नाहीं गांठीं ॥ जरी तें वेंचूं यासाठीं ॥ ज्ञानदेवें हें शेवटीं ॥ पाठी लाविली उपाधी ॥५०॥
मग विचार करीत आपुलें मनीं ॥ म्हणे विद्या नाहीं याचें प्राक्तनीं ॥ म्हणोनि ज्ञानदेवें कंटाळोनी ॥ धरणें पाठवून दिधलें ॥५१॥
म्हणे मी नेणता अज्ञान ॥ नेणेंचि जप तप अनुष्ठान ॥ ज्ञानदेवें मजलागून ॥ कासया थोरपण दिधलें ॥५२॥
मग अकरा अभंग आणि नारळ ॥ ब्राह्मणासी दिधले ते वेळ ॥ म्हणे हें भक्षिशी जे वेळ ॥ ज्ञान तत्काळ तुज होईल ॥५३॥
ब्राह्मणाचें विकल्पी मन ॥ म्हणे नारळ भक्षितां नव्हे ज्ञान ॥ प्राकृत अभंग मजकारण ॥ पाहिजेत पैं कासया ॥५४॥
ऐसा विकल्प चित्तीं धरून ॥ टाकूनि गेला प्राक्तनहीन ॥ जैसा चिंतामणि हातीं लागतां जाण ॥ गोफणी घेऊन दवडिला ॥५५॥
कां निधान सांपडतां अभाग्याला ॥ तें कोळशाऐसें दिसे त्याला ॥ नातरी पक्वान्न रोगियाला ॥ कडवट जिव्हेसी लागत ॥५६॥
कां भागिरथीची कुपी जाण ॥ उन्मत्तासी भासे मद्यपान ॥ नातरी कल्पतरूचें वन ॥ जाय डावलून दरिद्री ॥५७॥
तेवीं तुकयानें प्रसाद दिधला ॥ तो विप्रें तेथेंचि टाकिला ॥ मग अलकावतीस ज्ञानराजाला ॥ पत्र लिहून पाठविलें ॥५८॥
मज पामरासी देऊनि थोरी ॥ येथें पाठविला धरणेकरी ॥ तुमची आज्ञा वंदोनि शिरीं ॥ उचित झडकरी दिधलें ॥५९॥
तेणें विकल्प धरूनि मग ॥ टाकिले एकादश अभंग ॥ महाफळाच करूनि त्याग ॥ गेला सवेग तेथूनी ॥६०॥
ऐसें कल्पोनि मानसीं ॥ निरोप पाठविला आळंदीसी ॥ मग ध्यानांत आणूनि हृषीकेशी ॥ नामस्मरण करीतसे ॥६१॥
तंव शिवाजीराजापासीं देख ॥ शास्त्रज्ञ होता पुराणिक ॥ त्याचा ब्राह्मणजन एक ॥ होता अति मूर्ख अज्ञानी ॥६२॥
तो तुकोबापासीं सत्वर ॥ करावयासी आला नमस्कार ॥ तोचि नारळ उचलोनि वैष्णववीरें ॥ त्याचे हातीं दिधला ॥६३॥
आणि एकादश अभंग ठेविले लिहून ॥ तेही दिधले त्याकारण ॥ तेणें तो नारळ फोडून ॥ तेथेंच भक्षिला निजप्रीतीं ॥६४॥
बिर्‍हाडासी गेला तो ब्राह्मण ॥ तों तेथें मांडिलें होतें पुराण ॥ श्रवणासी बैसले पंडितजन ॥ अति निपुण वेदशास्त्रीं ॥६५॥
आणिक श्रोते सज्ञान चतुर ॥ ऐकावया बैसले सादर ॥ तेथें तो ब्राह्मणजन येऊनि सत्वर ॥ करीत प्रश्न पुराणिका ॥६६॥
तुम्हीं श्लोक वाचिला आतां ॥ त्याचे पदाचा अर्थ राहिला सांगतां ॥ पंडित मागुती विचारितां ॥ तों यथार्थ समस्तां वाटलें ॥६७॥
म्हणती हें आश्चर्य बहुत ॥ यासी ओनामातों नव्हता येत ॥ एकाएकीं पुराणव्युत्पत्ति ॥ कैसी जाहली कळेना ॥६८॥
वृत्तांत पुसतां त्याकारण ॥ साकल्यें सांगितलें वर्तमान ॥ म्हणे एकादश अभंग तुकयानें ॥ आणि नारळ एक दीधला ॥६९॥
तो फोडोनि खातांचि ते वेळीं ॥ गीर्वाण भाषा कळों लागली ॥ ऐसी ऐकोनियां बोली ॥ तटस्थ जाहली सकळ सभा ॥७०॥
पुराणिकें समेप बोलावूनि प्रीतीं ॥ पत्र दिधलें त्याचे हातीं ॥ म्हणे हें वाचूनि दावीं आम्हांप्रती ॥ तरी सत्य प्रतीती वाटेल ॥७१॥
मग तुकयाचे पाय आठवूनि चित्तीं ॥ सांगूं लागला पुराणव्युत्पत्ती ॥ ऐकोनि पंडित तटस्थ होती ॥ आश्चर्य त्यांप्रती वाटलें ॥७२॥
म्हणती विष्णुभक्तांची अघटित करणी ॥ नव्हे तेंचि करूनि दाविती जनीं ॥ एक सद्भाव चित्तीं धरूनी ॥ चक्रपाणी वश्य केला ॥७३॥
जो लीलानाटकी भगवंत ॥ राईचा करी पर्वत ॥ त्याचे आवडते जे निजभक्त ॥ अघटित चरित्र तयांचें ॥७४॥
मूर्खासी ज्ञान जाहलें अद्भुत ॥ ही चिंचवडीं देवासी कळली मात ॥ मग ब्राह्मण मिळोनि समस्त ॥ स्वभावें बोलती एकमेकां ॥७५॥
आपण मताभिमान करून ॥ तुकयाचें करितों हेळण ॥ परी मनुष्य न म्हणावें त्यालागून ॥  यथार्थ वचन जाणिजे ॥७६॥
एक म्हणती पाचारूनि त्यासी ॥ प्रीतीनें पुसावें एके दिवसीं ॥ तूं कोण आहेसी हें सांग आम्हांसी ॥ ऐसें तुकयासी पुसावें ॥७७॥
तो ब्राह्मणभक्त अति प्रेमळ ॥ आपणासी सांगेल तत्काळ ॥ ऐसा चिंचवडीं ते वेळ ॥ विचार केला द्विजवरीं ॥७८॥
मग मनुष्य करूनि मोलकरी ॥ त्यासी सांगितलें ते अवसरीं ॥ तुवां जाऊनि तेथवरी ॥ तुकयासी लवकरी पाचारिंजे ॥७९॥
इतुकेंचि जाऊनि सांग वहिलें ॥ कीं चिंचवडीं देवांनीं पाचारिलें ॥ ऐसें ऐकूनि ते वेळे ॥ मनुष्य उठिला सत्वरी ॥८०॥
मग देहूसी येऊनि तयानें ॥ तुकयासी केलें साष्टांग नमन ॥ तंव तेथें होतसे हरिकीर्तन ॥ बैसले सज्जन श्रवणासी ॥८१॥
सप्रेमभावें अति सादर ॥ श्रवण करिती नारी नर ॥ नामघोषें कोंदलें अंबर ॥ पडला विसर देहाचा ॥८२॥
नाठवे कोणासी प्रंपंचभ्रांती ॥ लवों विसरलों नेत्रपातीं ॥ नामरूपीं जडलीं वृत्ती ॥ जाहली विश्रांती सकळिकां ॥८३॥
टाळकरी आणि मृदंग्यांसी ॥ आम्ही कोण हें नाठवें त्यांसी ॥ आपपर नाठवेचि कोणासी ॥ प्रेम मानसीं प्रगटलें ॥८४॥
हिलाल धरिला होता ज्यानें ॥ तयासी नाहीं देहभान ॥ नामरूपीं जडलें मन ॥ मी कोण हें स्फुरेना ॥८५॥
तेणें हिलाल करितां वरी ॥ तों मंडपासी लागला ते अवसरीं ॥ तों आणिक कथा लागली दुसरी ॥ ते सादर चतुरीं परिसावी ॥८६॥
चांभारगोंदियांत प्रसिद्ध ॥ ज्ञानसागर शेखमहंमद ॥ तो कीर्तन करीत सानंद ॥ प्रेमछंदें नामाच्या ॥८७॥
श्रवणासी बैसले बहुत जन ॥ अठरा वर्णांचे थोर लहान ॥ आणिक चतुर श्रीमंत जन ॥ सज्ञान ब्राह्मण पंडित जे ॥८८॥
एकाग्र ऐकती कीर्तन सांग ॥ कथेसी आला अद्भुत रंग ॥ पाखंडियांसी वचन न सुचे मग ॥ आरोगिले मूग ते समयीं ॥८९॥
तों वक्त्यानें ते वेळां ॥ उडी मारूनि मंडप चोळिला ॥ हे कौतुक देखोनि डोळां ॥ आश्चर्य सकळां वाटलें ॥९०॥
मग पुढें बैसले होते श्रवणीं ॥ ते पुसते जाहले तये क्षणीं ॥ कशाकरितां मंडप स्वामींनीं ॥ दाखविला चोळूनि आम्हांतें ॥९१॥
हें कौतुक दृष्टीं देखोन ॥ आशंकित जाहलें त्याचें मन ॥ शेखमहंमद देखोन ॥ काय बोलिला ते समयीं ॥९२॥
वैष्णव तुका देहुगांवांत ॥ प्रेमभावें कीर्तन करित ॥ तों मंडपासी हिलाल अकस्मात ॥ लागला अवचित न कळतां ॥९३॥
तो जळतां दृष्टीं देखिला तेथ ॥ म्यां निजकरें विझविला येथ ॥ ऐसी ऐकोनियां मात ॥ श्रोते आशंकित जाहले कीं ॥९४॥
हें कोणासी न वाटे खरें ॥ म्हणती देहूगांव बहुत दूर ॥ तुम्हांस तेथील समाचार ॥ कैशापरी श्रुत जाहला ॥९५॥
तेथेंही श्रोतयांचा असेल मेळा ॥ त्यांच्या काय न दिसे डोळां ॥ म्हणूनि मंडप तुम्हीं विझविला ॥ हें यथार्थ आम्हांला न वाटे ॥९६॥
मग शेखमहंमद बोले वचन ॥ तुकयाचें कीर्तनीं बैसलें जन ॥ तयांसी नाहीं देहभान ॥ करितां श्रवण हरिलीला ॥९७॥
नामरूपीं जडलें चित्त ॥ सकळ जाहले देहातीत ॥ हिलाल लागोनि मंडप जळत ॥ तो म्यां त्वरित विझविला ॥९८॥
यावरी श्रोते पुसती मात ॥ कीर्तनीं असे पंढरीनाथ ॥ त्याणें कां न चुकविला आघात ॥ मंडप जळतां देखोनी ॥९९॥
मग शेखमहंमद बोलती त्यांसी ॥ प्रेमें भुलला हृषीकेशी ॥ देवपण नाठवेच तयासी ॥ नाठवे भक्तांसी भक्तपण ॥१००॥
ते दोघे एक जाहले असती ॥ कोणीं रक्षावें कोणाप्रती ॥ जेवीं दोनी दीपक जळत असती ॥ भिन्न न दिसती सर्वथा ॥१॥
ते एके ठायीं करितां वस्ती ॥ समरसपणें मिळोनि जातीं ॥ ऐसी तयांची विदेहस्थिती ॥ माझें चित्तीं श्रुत जाहली ॥२॥
कीं सरितेमाजी विशाळ बेटें ॥ तेथें उदकाचे होती दोन वांटे ॥ मग पुढें होऊनि एकवटें ॥ भिन्नत्व न दाविती सर्वथा ॥३॥
कां प्रतिमा आणि उपकरण ॥ एकेचि पितळेचीं असती जाण ॥ मुशींत आटतां त्यांकारण ॥ न दिसती भिन्न सर्वथा ॥४॥
नातरी घृत नवनीत पाहीं ॥ दोन्ही कढविलीं एकेचि ठायीं ॥ त्यांसी वेगळेपण पाहतां कांहीं ॥ भिन्नत्व नाहीं सर्वथा ॥५॥
तेवीं देव भक्त जाहले असतां एक ॥ कोण कोणाचें जाणेल दुःख ॥ समरसे अविनाश जाहलें सुख ॥ भेदाभेद मावळले ॥६॥
देवपणा विसरले रुक्मिणीकांत ॥ तुकया न स्मरे मी भक्त ॥ तैसेच श्रोते जाहले समस्त ॥ हा मज वृत्तांत समजला ॥७॥
हें जरी तुम्हांस न वाटलें खरें ॥ तरी तेथूनि आणा समाचार ॥ ऐसें ऐकूनि उत्तर ॥ श्रोते चतुर संतोषले ॥८॥
मग देहूचे पाटिलासी पत्र लिहूनी ॥ एक सांडणी पाठविली त्यांणीं ॥ कीं रात्रीं कौतुक देखिलें नयनीं ॥ तें यथार्थ लिहूनि पाठवावें ॥९॥
अस्तमाना जातां दिनकर ॥ आलें त्याचें प्रत्युत्तर ॥ रात्रीं होतां कीर्तनगजर ॥ मंडपासी हिलाल लागला ॥११०॥
दीडहात छीद्र पडलें जाणा ॥ परी रात्रीं कळलें नाहीं कोणा ॥ सकाळीं उठोनि देखिलें नयना ॥ मग आश्चर्य मना वाटलें ॥११॥
ऐसें पत्र ऐकतां श्रवणीं ॥ यथार्थ वाटलें त्यांलागोनी ॥ मग शेखमहंमदापासीं येऊनी ॥ नमस्कार घातली ॥१२॥
म्हणती तेथील वृत्तांत ॥ तुम्हांसी कैसा जाहला श्रुत ॥ हा चमत्कार देखोनि अद्भुत ॥ साश्चर्य चित्त सकळांचें ॥१३॥
ऐसी ऐकूनि वचनोक्ती ॥ म्हणे काय सांगावें तुम्हांप्रती ॥ मीन नीटचि धार चढती ॥ ते आणिकां गती अवघड ॥१४॥
आणिका जळचरें बहुत जाण ॥ परी पत्स्याऐसें त्यां न लोटे जीवन ॥ तेवीं भक्तांचे मनींची खूण ॥ भाविकांवांचून कळेना ॥१५॥
कीं पिपीलिकांचे मार्गानें ॥ पिपीलिकाचि चालूं जाणे ॥ तेवीं वैष्णवांचे मनींची खूण ॥ भाविकांवांचून कळेना ॥१६॥
कीं अंतरिक्षीं विहंगम उडतां ॥ तेथें मार्ग पहावा कोणता ॥ परी पक्षीचि चालती त्या पंथा ॥ आणिकां सर्वथा कळेना ॥१७॥
जे कूपामध्यें बेडूक राहत ॥ ते काय जाणती पयोब्धीची मात ॥ तेवीं गुरुभक्तांची खूण निश्चित ॥ मायालोभियांसी कळेना ॥१८॥
ऐसी वचनोक्ति बोलोनि त्वरित ॥ शेखमहंमद राहिले निवांत ॥ आश्चर्य मानूनि श्रोते समस्त ॥ घातले दंडवत सकळांनीं ॥१९॥
असो सिंहावलोकनें आतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ जो चिंचवडीहूनि मनुष्य येतां ॥ त्यानें अकिली कथा तुकयाची ॥१२०॥
तेथेंचि जडला त्याचा भाव ॥ निरोप सांगावयाचा नाहीं आठव ॥ प्रपंचउद्वेग राहिला सर्व ॥ ऐसा जीव सुख पावला ॥२१॥
घरासी जावें परतोन ॥ हेंही सर्वथा नाठवे भान ॥ तुकयाचें होतांचि दर्शन ॥ जाहला तल्लीन निजप्रीतीं ॥२२॥
इकडे चिंचवडीं देव वाट पाहात ॥ म्हणती तुकयासी दिवस लागले बहुत ॥ मनुष्यही परतोनि नाहीं येत ॥ काय जाहलें कळेना ॥२३॥
मग विचार करूनि सकळांनीं ॥ दुसरा मनुष्य पाठविला त्यांनीं ॥ तोही तुकयाचें कीर्तन ऐकूनी ॥ विदेह होऊन बैसला ॥२४॥
विलंब लागतांचि त्याप्रती ॥ तिसरा पाठविला मागुती ॥ त्याचीहि उडाली देहभ्रांती ॥ सप्रेम चित्तीं होऊन ॥२५॥
मग गजवदनाचे उपासक ॥ आश्चर्य करिती सकळिक ॥ तिघे मनुष्य गेले देख ॥ न ये एकही परतोनी ॥२६॥
जेवीं गंगेसी वोहळ गेले ॥ ते आपलेपणासी समूळ मुकले ॥ कां नानापुष्पांचे मकरंद भले ॥ वायूसी मिळाले समरसें ॥२७॥
तरंग मिळाला जळांत ॥ कीं अभ्रचि लपलें आकाशांत ॥ कीं सुवागी पडे मुशींत ॥ ते नाहीं येत परतोनी ॥२८॥
तैसेंचि जाहलें त्यांकारण ॥ निरोपही न सांगती येऊन ॥ तुकयाचें ऐकतां सप्रेम गायन ॥ राहिले तल्लीन होऊनी ॥२९॥
तुकयासी सांगितलें असतें तयांनीं ॥ तरी यावया अनुमान न करितां मनीं ॥ त्याऐसा ब्राह्मणभक्त जनीं ॥ वैष्णव ज्ञानी असेना ॥१३०॥
तरी आपणचि सांडोनि वर्णाभिमान ॥ जाऊनि घ्यावें त्याचें दर्शन ॥ संशय वाटतसे मनीं जाण ॥ ते जीवींचि खूण पुसावी ॥३१॥
ऐसा विचार करूनि जाण ॥ ब्राह्मण निघाले तेथून ॥ हे अंतरीं तुकयालागून ॥ न सांगतां खूण कळलीं कीं ॥३२॥
म्हणे मनुष्यें पाठविलीं विप्रांनीं ॥ परी तो सांगितला नाहीं निरोप कोणीं ॥ आतां तेचि कृपावलोकनीं ॥ येताति चालोनि भेटावया ॥३३॥
तरी आपण न जातां येथून ॥ ब्राह्मणांचा होईल अपमान ॥ लक्ष्मीकांत ज्यांचे चरण ॥ हृदयीं भूषण वागवितो ॥३४॥
ते आले नाहींत येथवरीं ॥ तों आपण पुढें जावें सत्वरी ॥ ऐसें विचारून अंतरीं ॥ निघे सत्वरी तेधवा ॥३५॥
जैसी चातका तृषा लागत ॥ तों मेघ सत्वर धांवूनि येत ॥ कीं उदया येतां रोहिणीकांत ॥ सरितानाथ उचंबळे ॥३६॥
नातरी हिरकणी देखोनि सुंदरा ॥ ऐरणींतूनि निघे हिरा ॥ येरयेरांच्या अंतरा ॥ साक्ष जैसी प्रतीती ॥३७॥
कां चुंबकाची देखोनि प्रीती ॥ लोहरज येती तयाप्रती ॥ तेवीं द्विजवरांची अत्यंत प्रीती ॥ तुकया चित्तीं जाणवलें ॥३८॥
म्हणूनियां लवडसवडी ॥ विष्णुभक्त जातसे तांतडी ॥ श्रीहरीचे गुण कडोविकडी ॥ अति आवडीं गातसे ॥३९॥
अर्ध पंथ लोटतां त्वरित ॥ तों द्विजवर देखिले अकस्मात ॥ तुकयानें मग दंडवत ॥ अति प्रीतीनें घातलें ॥१४०॥
यावरी धरामर बोलत ॥ तूं साक्षात विष्णुभक्त ॥ म्हणोनि दर्शनाचा धरूनि हेत ॥ येत होतों तुजपासीं ॥४१॥
तंव येथेंच मनोरथ पूर्ण जाहले ॥ मग सप्रेम आलिंगन दिधलें ॥ आसनावरी द्विजवर बैसले ॥ तुकयासी बोलिले ते ऐका ॥४२॥
कलीमाजी अवतार घेउनी ॥ त्वां अघटित चरित्र दाखविलें जनीं ॥ हें देखिलें आपुलें नयनीं ॥ विस्मित मनीं होतसों ॥४३॥
मग अवसर पाहूनि एकांतीं ॥ पुसावयासी आलों तुम्हांप्रती ॥ तरी कोण आहां तें सत्वरगती ॥ आम्हांसी निश्चितीं सांगावें ॥४४॥
ऐकूनि द्विजवरांचें वचन ॥ विचार करी मनांतून ॥ म्हणे यांसी प्रचीत दाखविल्याविण ॥ संशयखंडन नव्हेचि ॥४५॥
मग आपुलें मांडींचें चर्म धरूनी ॥ ओढून चिरिलें तये क्षणीं ॥ तंव निखळ कापूस पिंजरोनी ॥ भरिला असे त्यामाजी ॥४६॥
हें द्विजवरांहीं द्केहोनि दृष्टीं ॥ आश्चर्य करिती आपुलें पोटीं ॥ म्हणती तुकयाची मनुषरहाटी ॥ कैची चालती कळेना ॥४७॥
रुधिर मांस नसतां कांहीं ॥ कैसें चैतन्य राहिलें देहीं ॥ एक म्हणती मायालाघवी ॥ ईश्वरकरणी अघटित ॥४८॥
पंच भूतांचें ओडंबर कोडें ॥ माया ममतेच्या लावूनि तोंडें ॥ जीवासी लाविलें विषयवेडें ॥ प्रपंचकाबाडें वाढविलें ॥४९॥
याविरहित तुका वैष्णवभक्त ॥ अनुभवें कळों आली प्रचीत ॥ यासी म्हणों नये मनुष्य प्राकृत ॥ जगद्गुरु निश्चित अवतरला ॥१५०॥
जैसें गंगेसी न म्हणावें जीवन ॥ कीं परिसासी न म्हणावें पाषाण ॥ कनकासी अन्य धातूंसमान ॥ लेखो नये सर्वथा ॥५१॥
वृक्ष नव्हेचि कल्पतरू ॥ कीं समुद्र न म्हणावा सरोवरू ॥ कीं इतर पर्वतांसमान मेरू ॥ लेखों नयेचि सर्वथा ॥५२॥
अंडाजयातीमाजी जाण ॥ निजभक्त जन्मला सुपर्ण ॥ तेवीं शूद्रयातींत हा वैष्णवजन ॥ उपमा गौण दिसताहे ॥५३॥
गरुडें विष्णूचें होऊनि वहन ॥ आपुलें शरीर केलें पावन ॥ तुकयानें करूनि हरिकीर्तन ॥ जड जीव संपूर्ण उद्धरिले ॥५४॥
पुढेंही याची ऐकोनि कवितां ॥ वैराग्य उपजेल खळांचें चित्ता ॥ भाविक सज्ञान वैराग्यभक्तां ॥ मार्ग प्रांजळ दाविला ॥५५॥
ऐसें बोलोनि द्विजवर ॥ तुकयासी करिती नमस्कार ॥ येरू वरवरी धरूनि शिर ॥ चरणीं सादर लागला ॥५६॥
विप्रांसी म्हणे ऐका मात ॥ हें तुम्हीं करितसां अनुचित ॥ आमुचा स्वामी भृगूची लात ॥ हृदयीं वागवीत अद्यापि ॥५७॥
जो देवाधिदेव जगज्जीवन ॥ त्यासही तुम्ही पूज्यमान ॥ आणि मी हीनयाति अनाथ दीन ॥ देतसां थोरपण निजकृपें ॥५८॥
यावरी द्विजवर उत्तर देती ॥ ज्यासी विष्णुभजनीं लागली प्रीती ॥ त्याची म्हणावया नीच जाती ॥ कुंठित श्रुति जाहल्या कीं ॥५९॥
वानर विनटले श्रीरामभजनीं ॥ तें वाल्मीकें वर्णिलें रामायणीं ॥ गोवळ्यांची कीर्ति पुराणीं ॥ ठेविली लिहूनि श्रीव्यासें ॥१६०॥
म्हणोनि तुझी करावया स्तुती ॥ अधिकार आहे आम्हांप्रती ॥ जे विष्णुभक्तांची अद्भुत कीर्ती ॥ भरूनि त्रिजगती उरली असे ॥६१॥
बहुत दिवस होता हेत ॥ तो आजि पुरला मनोरथ ॥ जे मांडी चिरूनि निजहस्तें त्वरित ॥ दाविली प्रचित आम्हांसी ॥६२॥
पुढती आलिंगन देउनि प्रीतीं ॥ ब्राह्मण तुकयासी काय बोलती ॥ चिंचवडीं चलोनि एक रातीं ॥ कीर्तन निगुती करावें ॥६३॥
त्यांचें राखावया मनोगत ॥ नगरांत गेले एक रात ॥ तों लोहोगांवींचे मिळोनि गृहस्थ ॥ विचार करीत एकमेकां ॥६४॥
म्हणती तुकयासी आणोनि आपुलें नगरीं ॥ कीर्तन ऐकावें धणीवरी ॥ ते सेवितां प्रेमामृतलहरी ॥ सार्थक संसारीं होईल ॥६५॥
मग तुकायासी विनीत होऊनी ॥ लोहोगांवासी नेलें तयांनीं ॥ नित्य नित्य आवडीकरूनी ॥ ऐकती श्रवणीं हरिकथा ॥६६॥
भाविक लोक जे सज्जन ॥ करिती ब्राह्मणसंतर्पण ॥ नानापरींचीं पक्वानें करून ॥ घालिती भोजन विप्रांसी ॥६७॥
दिव्य मंडप उभारून ॥ पुष्पाहार सुगंध चंदन ॥ कीर्तनासी प्रारंभ होतां जाण ॥ करिती पूजन वैष्णवांचें ॥६८॥
लोहोगांवांत एक मास ॥ नित्य नित्य सोहळा विशेष ॥ तंव पंढरपुरचे हरिदास ॥ देशावरास चालिले ॥६९॥
तंव व्यवसायी बैसोनि अश्वावरी ॥ सत्वर चालिला बाजारीं ॥ देखोनि हरिदास ते अवसरीं ॥ काय बोलती तयासी ॥१७०॥
अश्वारूढ होऊनि मार्ग क्रमिसी ॥ येथें तुज निद्रा लागली कैसी ॥ हें नवल देखोनि दृष्टीसी ॥ आश्चर्य आम्हांसी वाटलें ॥७१॥
तंव व्यवसायी बोले त्यांकारण ॥ चार्‍ही प्रहर रात्रीं जागरण ॥ ऐसें एक मासपर्यंत जाण ॥ होतसे कीर्तन तुकयाचें ॥७२॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ हरिदास जाहले चिंताक्रांत ॥ म्हणती आपण लोहोगांवांत ॥ आतां न जावें सर्वथा ॥७३॥
जेथें प्रेमळाचें कीर्तन होत ॥ तरी आपुलें कसब न रुचे तेथ ॥ जेवीं रोगियासी लाधलें दिव्यामृत ॥ तो न घे औषध कल्पांतीं ॥७४॥
अमूल्य हिरियांसी दीप्ती ॥ कांचमणी लोपोनि जाती ॥ नातरी उदयासी येतां गभस्ती ॥ दीपक हरपती त्यापुढें ॥७५॥
समीप गंगा वाहतां जाण ॥ तेथें मग वापीकूपांसी पुसे कोण ॥ तेवीं प्रासादिकांचें ऐकतां कीर्तन ॥ धीटपाठ गायन रुचेना ॥७६॥
तरी लोहोगांव डावलोनियां पुढारा ॥ आतां चलावें आणिका नगरा ॥ ऐसें बोलोनियां येरयेरां ॥ हरिदास सत्वरां परतले ॥७७॥
गांवींचे लोक होत तेथ ॥ ते सत्वर येऊनि नगरांत ॥ तुकयासी सांगती वृत्तांत ॥ जो देखिला दृष्टीसी ॥७८॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ तेथोनि उठिला न लागतां क्षण ॥ म्हणे आपण सामोरा जाऊन ॥ आणावें प्रार्थून हरिदासां ॥७९॥
आपण सवेग चालत ॥ अंतरीं उल्हास वाटे बहुत ॥ ग्रामवासी लोक समस्त ॥ तेही चालती सामोरे ॥१८०॥
म्हणती पंढरीक्षेत्रीं हरिदास ॥ चालिले होऊनि उदास ॥ त्री आपण प्रार्थूनियां तयांस ॥ आणावें नगरास आपुल्या ॥८१॥
मग पुढें धांवणार पाठवूनी ॥ परतविलें तयांलागोनी ॥ म्हणती वष्णव तुका आवडीकरूनी ॥ भेटावयासी येतसे ॥८२॥
इतुका निरोप सांगतां जाण ॥ तंव तेही पावले न लागतां क्षण ॥ मग हरिदासांसी करूनि नमन ॥ देऊनि आलिंगन भेटले ॥८३॥
तुकयास म्हणती क्षेत्रवासी ॥ आम्हीं पातलों देशावरासी ॥ कीं घरीं लग्न वैशाखमासीं ॥ करणें असे पुत्राचें ॥८४॥
अवश्य म्हणोनि ते वेळे ॥ गांवांत हरिदासांसी आणिलें ॥ राहावयासी देऊनि स्थळ चांगलें ॥ शिधासाहित्य पाठविलें ॥८५॥
मग करूनियां भोजन ॥ रात्रीं करिती हरिकीर्तन ॥ एकमासपर्यंत जाण ॥ होतसे आनंद या रीतीं ॥८६॥
मग ग्रामवासियां भाविक लोकां ॥ आज्ञा करी वैष्णव तुका ॥ आतां देशावर करूनि देखा ॥ हरिदासां वाटे लावावें ॥८७॥
ब्राह्मणांचे कष्ट घेऊन ॥ मग त्यांसी द्यावें द्रव्यदान ॥ हें तुम्हांसी वाटतें भूषण ॥ परी पदरीं पुण्य पडेना ॥८८॥
तरी नगरांत आहेत वस्तिकर ॥ नांदताति  लहान थोर ॥ त्यांची शक्ति पाहूनि साचार ॥ मागा देशावर सकळांसी ॥८९॥
ऐकोनि तुकयाची वाणी ॥ अवश्य म्हणती तये क्षणीं ॥ मग दऊत लेखणी पत्र आणोनी ॥ आसाम्या मांडोन दिधल्या ॥१९०॥
उत्तम मध्यम कनिष्ठ जाण ॥ नगरांत नांदत असती जन ॥ ते म्हणती तुकयालागोज्न ॥ पत्रीं अंक घालावा ॥९१॥
मग उत्तमावरी घालूनि तुळ ॥ टाळी लिहिली मध्यमावर ॥ कनिष्ठावरी पकार ॥ लिहिला सत्वर ते समयीं ॥९२॥
तें देखोनि ग्रामवासी ॥ म्हणती हें नये आमुचें चित्तासी ॥ मग तुका उत्तर देत तयांसी ॥ जें येईल चित्तासी तें करा ॥९३॥
त्यांनीं उल्हास धरून अंतरीं ॥ मूळु लिहिलें उत्तमावरी ॥ उदाणुकें आंख झडकरी ॥ मध्यमावरी टाकिला ॥९४॥
पकार होता कनिष्ठावरी ॥ एक आंख घातला त्यावरी ॥ तुकयास दाऊनि सत्वरी ॥ गांवकरी ऊठले ॥९५॥
गांवांत जाऊनि सत्वर ॥ उकलोनि आणिलें देशावर ॥ मुख्य जे म्हणवीत होते थोर ॥ ते तुकयासी उत्तरबोलती ॥९६॥
पुढें ठेवूनि द्रव्यराशी ॥ म्हणती आम्हीं युक्त केली कैसी ॥ आतां देशावर हरिदासांसी ॥ आपुले हातीं समर्पा ॥९७॥
ऐसें बोलतां ते अवसरीं ॥ तुकयासी कळों आलें अंतरीं ॥ कीं दातियांच्या चित्तांतरीं ॥ अहंकारवैरी प्रकटला ॥९८॥
जैसी पक्वान्नांत पडिली मक्षिका ॥ कीं दुग्धामाजी लवणकणिका ॥ कीं प्रेमळांमाजी लटिका ॥ कुटिळ येऊन बैसला ॥९९॥
कीं तारुण्यदशेंत क्षयरोग ॥ कीं विप्रसभेंत प्रकटला मांग ॥ नातरी विरक्तासी स्त्रीसंग ॥ कर्मयोगें जोडला ॥२००॥
कीं क्षेत्र पिकासी आलें बहुत ॥ तों टोळधाड पडली अकस्मात ॥ कीं पश्चिमधान्यांवरी मार्गेश्वरांत ॥ तांबारा अवचित पडियेला ॥१॥
नातरी गगनीं ओळल्या पर्जन्याधारा ॥ तों अकस्मात सुटला दक्षिणवारा ॥ कीं पौर्णिमेचा चंद्र उगवतां बरा ॥ तंव राहु प्रगटला त्याआड ॥२॥
तेवीं दान देते अवसरीं ॥ यासी अभिमान पातला वैरी ॥ जेणें होय याची बोहरी ॥ तैसीच परी करावी ॥३॥
मग लोकांसी म्हणे वैष्णवभक्त ॥ देशावर आणिलें तुम्हीं समस्त ॥ तरी चुकलें वांकलें गांवांत ॥ राहूं सर्वथा न द्यावें ॥४॥
लोक म्हणती ते वेळ ॥ गांवांत साळी एक दुर्बळ ॥ तो निंदक नष्ट महाखळ ॥ नाहीं प्रेमळ अंतरीं ॥५॥
तो एक राहिला असे जाण ॥ इतरीं दिधलें शक्तिप्रमाण ॥ ऐसें ऐकोनि वचन ॥ भक्त प्रेमळ बोलत ॥६॥
तुम्ही जाऊनि त्याचें मंदिरीं ॥ माझा निरोप सांगा सत्वरीं ॥ रुका अधेला कांहीं तरी ॥ आणा धर्मार्थ मागुनी ॥७॥
ऐकोनि तुकयाचें वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ मग साळियाचें घरासी जाऊन ॥ अंगणीं उभे राहिले ॥८॥
परी तो कांहींचि न बोले वचनासी ॥ पांजणी करी वेगेंसीं ॥ तुम्ही कोण आलेत कासयासी ॥ उत्तर कोणासीं करीना ॥९॥
गांवकरी विस्मित होऊन ॥ एकमेकांसी सांगती खूण ॥ म्हणती तुकयाचे भिडेकरून ॥ मूर्खापासीं पातलों ॥२१०॥
परी हा कांहीं न बोले वचन ॥ मग बोलते जाहले सकळ जन ॥ पंढरीचे हरिदास आले जाण ॥ एक मास कीर्तन होतसें ॥११॥
कांहीं देशावर मागावयासी ॥ तुकयानें पाठविलें तुजपासीं ॥ वचनें ऐकोनि ऐसीं ॥ मूर्ख मानसीं संतापला ॥१२॥
म्हणे तुकयानें मांडिली बडबड ॥ तैंपासोनि तुम्हां लागलें वेड ॥ सांडोनियां लौकिकचाड ॥ नाचतां उघड कीर्तनीं ॥१३॥
आपुल्या संसारा पाडूनि तुटी ॥ आतां कां घेतसां माझी पाठी ॥ घरीं नाहीं थाळा वाटी ॥ मी तुम्हांसी शेवटीं काय देऊं ॥१४॥
ऐकूनि मूर्खाचें वचन ॥ कांता बोले त्यालागून ॥ थोर थोर लोक तुकयाचें वचनें ॥ अंगणीं येऊन उभे कीं ॥१५॥
तुम्ही निंदक परम खळ ॥ मुखें न बोला शब्द रसाळ ॥ बैसावयासी निर्मळ स्थळ ॥ तेंही न मिळे सर्वथा ॥१६॥
आतां विवेक करूनि चित्तीं ॥ कांहीं तरी द्यावें यांप्रती ॥ ऐकोनि कांतेची वचनोक्ती ॥ मूर्ख चित्तीं संतापला ॥१७॥
सक्रोध होऊनि बोले काय ॥ एक तांब्या घरांत आहे ॥ तो यांसी देऊनि लवलाहें ॥ वाटे लावीं सत्वर ॥१८॥
ऐकूनि भ्रताराचें वचन ॥ कांता पावली समाधान ॥ मग उदकपात्र आणून ॥ त्याचे करीं दीधलें ॥१९॥
त्यानें दिधलें डाव्या करीं ॥ यांनीं लभ अनुभविला अंतरीं ॥ त्यांब्या घेवोनियां करीं ॥ निघाले झडकरी तेथूनी ॥२२०॥
आश्चर्य करिताती सकळ ॥ म्हणती प्रसन्न जाहला खळ ॥ दावाग्नि होय शीतळ ॥ कीं शेरासी फळ जैसें आलें ॥२१॥
आजि शुष्क काष्ठासी अंकुर फुटला ॥ क

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती