नरहरी सोनार नावाच्या महान विठ्ठल भक्ताचा जन्म 1313 मध्ये भुवैकुंठ श्री पंढरपूर धाम येथे अच्युत बाबा आणि सावित्रीबाई यांच्याकडे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशीला अनुराधा नक्षत्रात सवंत शके 1115 च्या पहाटे झाला.माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो. नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले. नरहरी सोनार यांच्या घरी परंपरेने शंकराची पूजा चालू होती. त्यांचे वडील अच्युत बाबा हे मोठे शिवभक्त होते, ते रोज शिवलिंगाला अभिषेक करून बिल्वपत्र अर्पण करूनच कामावर जात असे.
भगवान शिवाच्या कृपेनेच त्यांच्या घरी नरहरीचा जन्म झाला.बाळाच्या जन्माच्या बाराव्या दिवशी चांगदेव महाराज नरहरींच्या घरी आले आणि त्यांनी बाळाचे नाव नरहरी ठेवले. वयाच्या सातव्या वर्षी बाळ नरहरींचे यज्ञोपवित संस्कार झाले. त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्राचे उपदेश गहिनीनाथ महाराजांकडून मिळाली. त्यांचा विवाह वयाच्या विसाव्या वर्षी गंगाबाई यांच्याशी झाला.
महाशिवरात्रीला त्यांच्या आई वडिलांना परमात्यात विलीन होण्याचे संकेत मिळाले आणि त्यांना देवाज्ञा झाली.नरहरी महाराज हे शिवभक्त होते. यांच्याव्यतिरिक्त ते इतर कोणीही देवाची भक्ती करत नसे. पंढरपुरात राहून देखील ते कधीही पांडुरंगाच्या दर्शनास गेले नाही. कालांतरानंतर पांडुरंग आणि शिवशंकर हे एकच आहे ह्याचा त्यांना अनुभव आला.एके दिवशी पांडुरंगाने आपल्या भक्त नरहरीची परीक्षा घेण्याचा विचार केला गावातील सावकाराला विठ्ठलाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्ती झाली.सावकाराने नवस फेडण्यासाठी विठल्लासाठी कंबरेची सोनसाखळी करण्याचे ठरविले आणि त्यांनी नरहरी सोनार ह्यांना सोनसाखळी तयार करण्यास सांगितले.नरहरी सोनार ह्यांनी सोनसाखळी तयार करण्यास नकार दिला कारण ते महादेवाव्यतिरिक्त कोणत्याही देवाची भक्ती करत नसे म्हणून त्यांनी इतर कोणत्याही देवाचे मुखदर्शन करण्यास नकार दिला.मात्र सावकाराने विनवणी केल्याने सावकारानी स्वतः विठ्ठलाचा कंबरेचा माप आणून देण्याचे ठरविले.नंतर नरहरी सोनाराने सुंदर अशी सोनसाखळी तयार केली मात्र पांडुरंगाला घातल्यावर सोनसाखळी वीतभर जास्त निघाली नंतर सोनसाखळी कापण्यात आल्यावर देखील त्याचे नाप वीतभर जास्त असायचे. नंतर नरहरी सोनार ने स्वता विठ्ठलाच्या कंबरेचा माप घेण्याचे ठरविले. डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कंबरेचा नाप घेण्यासाठी मंदिरात गेले. सोनसाखळी कंबरेला बांधू लागल्यावर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली हात गळ्यापर्यंत नेल्यावर त्यांना विठलाच्या गळ्यात शेषनाग असल्याचे भासले. त्यांनी डोळ्यावरील पट्टी काढल्यावर त्यांना समोर विठ्ठलाची मूर्ती दिसली.डोळ्यावर पुन्हा पट्टी बांधल्यावर शंकराचा स्पर्श जाणवला. हे सर्व पाहून ते फार गोंधळले. नंतर त्यांच्या लक्षात आले की शंकर आणि पांडुरंग हे एकच आहे. आणि तेव्हा पासून ते पांडुरंगाची मनापासून सेवा आणि भक्ती करू लागले. ते विट्ठलाचे नामस्मरण करून त्यांचे भजन म्हणायचे. पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रम्ह दिसु लागले. त्यांचा अंतकरणामध्ये भगवान वास करु लागलेत. नरहरीच्या दुकानामध्ये स्वत: भगवान येऊन दागिने घडवायचे.अशी आख्यायिका आहे.