Sant Muktabai Information in Marathi:संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती

रविवार, 14 मे 2023 (10:00 IST)
या महाराष्ट्रातील मोठ्या संत कवयित्री होत्या. यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. 1279 साली झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. नाथांच्या आख्यायिकेनुसार मुक्ताबाई ही विठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी या गोदावरीच्या काठी पैठणजवळील आपेगाव येथील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी  झाला. यांना निवृत्ती ,नागदेव, सोपानआणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली. मुक्ताबाई यांना  ''मुक्ताई नावाने ओळखल्या जातात.मुक्ता यांचे  निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. यांचा आई वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे आपल्या भावंडांची जबाबदारी यांचावर आली. त्यांनी सामर्थ्यपणे जबाबदारी घेतली आणि निभावली. ह्या चारही बहिण भावंडानी ब्राम्हविध्येची अखंड उपासना केली. मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले.मुक्ताबाईंनी योगी चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ उलगडून दाखविले. मुक्ताई वयाच्या आठव्या वर्षी चांगदेवाच्या आध्यात्मिक गुरु बनल्या. मुक्ताबाईंना गोरक्षनाथांच्या कृपेने अमृत संजीवनी प्राप्त झाली. 
 
ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिल्यावर मुक्ताबाईंना रिते हस्ते यावे लागले. ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मुक्ताबाईला मांडे भाजण्यास सांगितले. हा चमत्कार विसोबाचाटीने बघितल्यावर तो ज्ञानेश्वरांच्या शरणी आला.आणि मांडे खाण्यासाठी धडपडू लागला. त्याला मुक्ताईने खेचर असे सम्बोधीत केले तेव्हा पासून त्यांना विसोबा खेचर असे नाव पडले. 
 
 
संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. 12 मे 1297 रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येते आहे.
 
संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग- 
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.
 
योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा।।
विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी।।
शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।।
विश्वपट ब्रह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
 
संत तोचि जाणा जगी। दया क्षमा ज्याचे अंगी।।
लोभ अहंता नये मना। जगी विरक्त तोचि जाणा।।
इहपर लोकी सुखी। शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी।।
मिथ्या कल्पना मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
 
मुक्तेच्या अथक प्रयत्नाने आणि त्या अभंगांनी शेवटी ज्ञानेश्वरांचे मन बधले आणि ते दार उघडुन बाहेर आले

Edited By - Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती