Putrada Ekadashi Katha पुत्रदा एकादशी महात्म्य

रविवार, 27 ऑगस्ट 2023 (10:00 IST)
महाराज युधिष्ठिर यांनी विचारले,'हे परमेश्वरा! आपण एकादशीचे महात्म्य सांगून आमच्यावर मोठी कृपा केली आहे. आता आम्ही आपल्याला विनंती करतो की, पौष शुक्ल एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते, त्याचा विधी काय व व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते.'
 
भक्तवत्सल परमेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, 'हे राजन! या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी होय. या दिनी विष्णू नारायणाची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही. व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी, विद्वान व धनवान होतो. यासंदर्भात एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका.'
 
भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे. त्याला संतान नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. ती निपुत्रिक असल्याने नेहमी दु:खी असायची. राजाकडे धन-संपत्ती, हत्ती, घोडे, मंत्री- संत्री सगळे होते, मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते.
 
मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल, याच विचारात राजा असायचा. मुलगा नसल्याचे आपण पुर्वज व देवाचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते. ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो, अशी राजाची समजूत झाली होती. कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे,राजाला सारखे वाटायचे.
 
ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे, तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पुर्वजन्माच्या पुण्‍याईने व्यक्तीला पुत्र, धनप्राप्ती होत असते. राजा अशा विचारात रात्रंदिवस गर्क असायचा.
 
राजा पहातच एका ऋषीचे म्हटले - 'हे राजन! आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात असेल ते वर मागा.'हे एकताच राजा त्यांना विचारले, 'महाराज आपण कोण आहात, येथे येण्याचे प्रयोजन काय?'
 
राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले, हे राजन! आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आले आहेत.
 
हे ऐकून राजाने म्हटले,'ऋषीदेवता मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या.'
 
ऋषीमुनी म्हणाले -'हे राजन! आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे ‍व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. राजाला कुल‍दीपक मिळाला. राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर,यशस्वी व प्रजापालक होता.
 
एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला. मात्र, आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा-फुलाना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्तसंचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावाधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता- 'मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राम्हण देवताला भोजन करून तृप्त केले तरी ही माझ्या वाट्याला दु:खच का आले असावे?'
 
विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहुबाजुंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला.
 
तात्पर्य हेच की, पुत्र प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो व्यक्ती या व्रताचे माहात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्युपश्चात स्वर्गात जागा मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती