यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी

ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ऑक्टोबर मंगळवारी मंगळ पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र 21 ऑक्टोबर संध्याकाळी 5:33 वाजेपासून आरंभ होत 22 ऑक्टोबर मंगळवारी संध्याकाळी 4:40 वाजेपर्यंत राहील. या दोन्ही दिवस इतर शुभ योगांचे संयोग देखील आहेत. अशात खरेदी करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम ठरेल.
 
काही ज्योतिषांप्रमाणे 21 ऑक्टोबर दुपारी 01:39 ते 22 ऑक्टोबर दुपारी 3:38 पर्यंत पुष्य नक्षत्र राहील. वेळेत पंचागांनुसार भेद असू शकतात. यंदा दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वीच पुष्य नक्षत्र असल्याने महत्व अधिकच वाढलं आहे. 
 
दोन्ही दिवस आपण वाहन, घर, दुकान, कपडे, सोनं, भांडी, भूमी आणि भवन खरेदी करु शकतात. मान्यतेनुसार या दरम्यान केलेली खरेदी अक्षय राहते. अथार्त याचं कधीही क्षय होत नाही.
 
21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य नक्षत्र आहे आणि या दिवशी सिद्धी योग देखील आहे. सोम पुष्य नक्षत्रावर सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातू किंवा वस्तू खरेदी करणे शुभ असतं. या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
 
22 ऑक्टोबर रोजी भौम पुष्य नक्षत्र असेल. या दिवशी सकाळी 10:55 वाजेपासून साध्य योग आणि नंतर शुभ योग प्रारंभ होईल. भौम अर्थात मंगळ असतं. मंगळच्या दिवशी पुष्‍य योगात भूमी, घर, वाहन, तांबा इतर खरेदी करणे शुभ ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती