दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसतील तर एकदा वाचून घ्या

आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या तिथीला दिवाळी सण साजरा करून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी आधीपासूनच तयारी सुरू होते. सुख,समृद्धीची कामना करत प्रत्येक व्यक्ती या सणानिमित्त घराची साफ-सफाई करत असून देवी आगमनाची प्रार्थना करत असतो. ज्याने आर्थिक स्थिती चांगली राहते. परंतू जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता अती प्रिय असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच वास्तू शास्त्रानुसार देखील घरात दिवाळी साजरी करताना घरात तुटक्या-फुटक्या वस्तू मुळीच नसाव्या. तर जाणून घ्या दिवाळीची सफाई करताना कोणत्या प्रकाराच्या वस्तू घरातून बाहेर कराव्या.
 
काचेचं तुटलेलं सामान
घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका काच, तुटलेला आरसा असल्यास लगेच फेकून द्यावा. त्याजागी नवीन काच बसवावा. घरात तुटका-फुटका काच असणे अशुभ मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार फुटक्या आरशात चेहरा बघणे अत्यंत अशुभ ठरतं. याने घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो.
 
खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे
घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडलेले असतील तर त्यांना दुरुस्त करवावे किंवा घरातून बाहेर काढावे. बिघडलेलं इलेक्ट्रिक सामान आपल्या आरोग्य आणि सौभाग्यासाठी अशुभ ठरेल.
 
खंडित मुरत्या
कधीही चुकून देवी-देवता किंवा संतांच्या खंडित मुरत्या, फोटो यांचे पूजन करून नये. दुर्भाग्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या आधीच असे फोटो किंवा मुरत्या एखाद्या पवित्र नदीत प्रवाहित करावे.
 
गच्चीवरील भाग
दिवाळीपूर्वी घरातील गच्चीवरील भाग किंवा टॉवर जेथे अनेक लोकं भंगार जमा करून ठेवतात किंवा असं सामान जे वर्षांपासून कामास आलं नसेल त्याचा उगाच सांभाळ न करता घरातून बाहेर करणे अधिक योग्य ठरेल.
 
बंद घड्याळ
वास्तूनुसार घड्याळ प्रगतीचे प्रतीक आहे. अशात बंद घड्याळ निश्चितच आपल्या प्रगतीच अडथळे निर्माण करेल. म्हणून घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्याला दुरुस्त करवावे किंवा घरातून बाहेर करावे.
 
जुने जोडे-चपला
दिवाळीची सफाई करताना सर्वात आधी आपण वापरत नसलेले जोडे-चपला घरातून बाहेर करायला विसरू नका. जुने जोडे-चपला नकारात्मकता आणि दुर्भाग्यासाठी कारणीभूत ठरतात.
 
फुटके भांडे
कधीही तुटके- फुटके भांडे वापरू नये. आपण वापरत नसलेले भांडे किंवा क्रेक झालेले भांडे घरातून बाहेर करा. यामुळे घरात वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
 
घरातील फर्निचर
वास्तुशास्त्राप्रमाणे घरात तुटकं फर्निचर ठेवणे अशुभ मानले गेले आहे. घरात फर्निचर कमी असल्यास हरकत नाही परंतू तुटकं फर्निचर वाईट परिणाम सोडतं.
 
जुने, फाटलेले कपडे, चादरी, गाद्या
दिवाळीआधी पेटीत किंवा अलमारी वर्षांपासून सांभाळून ठेवलेले असे कपडे बाहेर काढा जे आपण वापरत नसाल. जुने, फाटलेले कपडे, चादरी, गाद्या वेळेवारी घरातून बाहेर काढाव्या. ज्या वस्तू वापरण्यात येत नाही अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मकता वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती