Panchak : 2 ऑगस्टपासून पंचक सुरू होत असून, पुढील 5 दिवस ही काम करू नये

बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (14:30 IST)
Panchak is starting from August 2आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2023 पासून पंचक कालावधी सुरू झाला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचक काल 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान चालेल. पंचक काळ कोणत्याही कामासाठी शुभ मानला जात नाही. धनिष्‍ठ नक्षत्र, उत्तराभाद्रपदा, पूर्वाभाद्रपद, रेवती आणि शतभिषा नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात चंद्राचे भ्रमण झाल्यावर पंचक कालावधी सुरू होतो. तसेच जाणून घ्या पंचक काल कोणता आहे आणि या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
 
पंचक काळ सुरू होण्याची वेळ
पंचक दर महिन्याला होते. या वेळी पंचक 2 ऑगस्ट 2023 रोजी 11.26 मिनिटे 54 सेकंदांनी सुरू झाला असून सोमवार, 7 ऑगस्ट रोजी 1.44 मिनिटे 5 सेकंदांनी संपेल.
 
ज्योतिषांच्या मते अशी 5 नक्षत्रे आहेत ज्यांच्या विशेष संयोगाने पंचक नावाचा योग तयार होतो. चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करत असतो, त्या वेळी पंचक होते. असे मानले जाते की पंचक दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये आणि पंचकची विशेष काळजी घ्यावी.
 
 नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती