जीवनात यश मिळविण्यासाठी गणपतीची आराधना केली जाते. कुटुंबात सुख-शांती, समृद्धी, यश, उत्तम आरोग्यासाठी गणपतीचे मयूरेश स्तोत्र सिद्ध व लगेच फल देणारे सिद्ध होतात. राजा इंद्राने मयूरेश स्तोत्राने गणपतीला प्रसन्न करून विघ्नांवर विजय प्राप्त केली होती. चतुर्थीच्या दिवशी याचा पाठ केल्याने फल सहस्र पटाने वाढून जातं.
विधी:
* सर्वात आधी शुद्ध होऊन स्वच्छ वस्त्र धारण करावे
* काही विशेष इच्छा असल्यास लाल वस्त्र आणि लाल चंदन वापरावे
* पूजा केवळ मनाच्या शांती किंवा अपत्याच्या प्रगतीसाठी असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे. पांढरे चंदन वापरावे
* पूर्वीकडे तोंड करून आसन ग्रहण करावे
* ॐ गं गणपतये नम: म्हणत गणपतीची प्रतिमा स्थापित करावी
निम्न मंत्राद्वारे गणपतीचे ध्यान करावे
'खर्वं स्थूलतनुं गजेंन्द्रवदनं लंबोदरं सुंदरं
प्रस्यन्दन्मधुगंधलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्
दंताघातविदारितारिरूधिरै: सिंदूर शोभाकरं
वंदे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम।'
गणपतीच्या 12 नावांचे पाठ करावे
'सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायक :
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन:
द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणयादपि
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमें तथा संग्रामेसंकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते'