धर्म ग्रंथानुसार श्रीगणेश प्रथम पूज्य देव म्हटले जाते. यांच्या वेग वेगळ्या स्वरूपांची पूजा केल्याने सर्व देवी देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होते. कुठल्याही शुभ कामाची सुरुवात गणेशच्या पूजेसोबत होते. येथे जाणून घेऊ श्रीगणेशाच्या 4 अशा चमत्कारी मुरत्या ज्यांची पूजा केल्याने घर परिवारात लक्ष्मी समेत सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि दरिद्री दूर होते.
हळदीच्या गाठीने बनलेली गणपतीची मूर्ती
हळदीच्या अशा गाठीची निवड करा, ज्यात गणपतीची आकृती दिसून येते. गणपतीचा ध्यान करत या गाठीची पूजा रोज केली पाहिजे. सुवर्णाने व हळदीने बनलेली गणेश प्रतिमा एकसारखे फल देतात.
गोमय अर्थात गोबराने बनलेली गणेश मूर्ती
गायीचे गोबर अर्थात गोमयमध्ये महालक्ष्मीचा वास असतो. हेच कारण आहे की गोमयने बनलेल्या गणेश मूर्तीची पूजा केल्याने गणपतीसोबत लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. गोबरद्वारे गणपतीची आकृती बनवा आणि त्याची पूजा करा.
लाकडाने बनलेली गणेश मूर्ती
खास वृक्ष जसे पिंपळ, आंबा, कडुलिंब इत्यादींमध्ये देवी देवतांचा वास मानला जातो. या झाडांच्या लाकडाने बनलेली गणेश मूर्तीला घराच्या प्रमुख दारावर लावावे. या मूर्तीची रोज पूजा केली तर घरातील सर्व दोष दूर होण्यास मदत मिळतात.