काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 गोष्टी जाणून घेऊ या

बुधवार, 27 जानेवारी 2021 (20:00 IST)
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड मध्ये पंचवटीचे रंजक वर्णन आढळते. या शिवाय पंचवटीचे वर्णन 'रामचरितमानस' 'रामचंद्रिका' 'साकेत' 'पंचवटी' आणि 'साकेत संत ' सारख्या काव्यांमध्ये मिळते. चला जाणून घेऊ या संदर्भात 8 गोष्टी.
 
1 वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटी क्षेत्रात पर्णकुटी बनवून राहू लागले. पंचवटी नाशिक जवळ गोदावरीच्या काठावर आहे. लक्ष्मणने  इथेच एक पर्णकुटी किंवा पर्णपाती बांधली होती. या ठिकाणी राम,सीता, लक्ष्मण झोपडी बनवून राहिले होते. इथूनच रावणाने माता सीतेचे हरण केले होते.
 
2 दंडकारण्यात मुनींच्या आश्रमात राहिल्यावर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले. हे आश्रम देखील दंडकवनात होते. हे नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात गोदावरीच्या काठी वसलेले आहे. 
 
3 ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाची नाक कापली होती. कदाचित म्हणून ह्या जागेला नंतर नाशिक म्हटले जाऊ लागले. 
 
4 ह्याच ठिकाणी  राम-लक्ष्मणाने खरं आणि दूषण सह युद्ध केले.
 
5 गिद्धराज जटायू आणि प्रभू श्रीरामाची मैत्री देखील इथेच झाली . पंचवटीला जाताना रामाला जटायू नावाचे गिधाड भेटले, जे राजा दशरथजींचे मित्र होते. 
 
6 मारीच चे वध देखील पंचवटीच्या जवळ मृगव्याधेश्वर येथे झाले. 
 
7 येथे श्रीरामाने बनविलेले एक मंदिर आज देखील भग्नावशेषरूपात आहेत. 
 
8 पंचवटीमध्ये पांच वडाचे झाड आहे जे जवळपास आहे. या मुळे ह्याचे नाव पंचवटी देण्यात आले. नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात सीता मातांच्या गुहेजवळ पाच प्राचीन झाडे आहेत ज्यांना पंचवटी नावाने ओळखतात. वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीताने काही काळ येथे घालवला. या झाडांचे धार्मिक महत्त्व देखील आहे. 
 
हे पाच झाडे खालील प्रमाणे आहे. 
1 अश्वत्थ 2 आमलक 3 वड 4 बिल्व 5 अशोक.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती